आता माझ्यावर अधिक जबाबदारी आहे. माझे पहिले लक्ष्य रिओ ऑलिम्पिकमध्ये अंतिम फेरी गाठणे हेच आहे, असे जिम्नॅस्ट दीपा करमारकर म्हणाली.
नवी दिल्ली- रिओ ऑलिम्पिकसाठी पात्र ठरल्याचे कळले तेव्हा मी अतिशय रोमांचित झाले. आता माझ्यावर अधिक जबाबदारी आहे. माझे पहिले लक्ष्य रिओ ऑलिम्पिकमध्ये अंतिम फेरी गाठणे हेच आहे, असे जिम्नॅस्ट दीपा करमारकर म्हणाली.
मी चांगली कामगिरी करू शकते आणि केले. हीच गोष्ट मी आपल्या मनात भरविली. त्यामुळे माझा आत्मविश्वास वाढला. गेल्या तीन महिन्यांपासून अविश्रांतपणे सराव करीत आहे. माझी तयारी उत्तम झाली आहे. प्रशिक्षण-सराव कार्यक्रमातील सूचनांचे तंतोतंत पालन केल्याचे तिने सांगितले.
एप्रिल महिन्यात मी पात्रता सिद्ध केली. तेव्हा ऑलिम्पिकसारख्या स्पर्धेची तयारी करण्यासाठी तीन महिन्याचा काळ पुरेसा नाही, याची मला जाणीव होती. ऑलिम्पिकसाठी खेळाडू संपूर्ण वर्षभर मेहनत करतात, परंतु मी याबाबतीत कमनशिबी ठरली.
त्रिपुराच्या दीपाने वयाच्या १४ व्या वर्षी राष्ट्रीय ज्युनिअर जिम्नॅस्टिक स्पर्धेत सुवर्णपदक मिळविले. आतापर्यंत तिने देशांतर्गत स्पर्धेत ७७ पदके जिंकली व आंतरराष्ट्रीय स्पर्धेत ६७ सुवर्णपदके जिंकली आहेत.