गेल्या काही दिवसांपासून होणा-या पावसामुळे मुंबई शहरातील जनजीवन विस्कळीत झाले आहे.
मुंबई – गेल्या काही दिवसांपासून होणाऱ्या पावसामुळे मुंबई शहरातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. सततच्या होणा-या पावसामुळे मुंबईकरांना अनेक अडथळ्यांना तोंड द्यावे लागले आहे पण त्यांनी हार मानलेली नाही. डॉक्सअॅप, ऑनलाइन हेल्थकेअर अॅपमुळे ३० मिनिटांपेक्षा कमी वेळात रुग्णांना डॉक्टरांशी संपर्क साधण्यात मदत होते. पावसामुळे प्रभावित मुंबईकरांना मोफत सल्ला देण्यासाठी पुढाकार घेण्यात आला आहे. पुराच्या वेळी बरेच रोग, संक्रमण इत्यादी होत असतात आणि रुग्णांना रुग्णालयात जाणे शक्य नसते.
ही चिंता दूर करण्यासाठी डॉक्स अॅप मुंबईकरांना मोफत सल्ला प्रदान करीत आहे. डॉक्सएपचे सीईओ आणि संस्थापक सतीश कन्नन म्हणाले की, ‘‘मुंबईकर कधीही हार मानत नाहीत, आलेल्या परिस्थितीला मागे सारत ते पुढे चालत असतात. अशा कठीण समस्येच्या काळात आपल्याला एकत्र येऊन एकमेकांना मदत करणे आवश्यक आहे. डॉक्सअॅप मुसळधार पावसामुळे अडकलेल्या लोकांना मदत करण्यासाठी प्रयत्नशील असून कोणत्याही वैद्यकीय समस्या असल्यास कृपया आमच्या हेल्पलाईन क्रमांक १८००-२७४-८३३३ वर संपर्क साधून डॉक्टरांचा विनामूल्य सल्ला घेण्याची सुविधा देऊ केली आहे.’’
[EPSB]
६ वे ‘टेकटेक्सटील इंडिया २०१७’ मध्ये टेक्सटाईल इनोव्हेशनची भरभराट..!!
पूर्ण जगात १२% सी.ए.जी.आर योगदान भारताचे आहे.
[/EPSB]