जगद्गुरु रामानुजाचार्य स्वामी कौशलेंद्र प्रपन्नाचारी फलाहारी महाराजला शनिवारी अलवर येथून अटक करण्यात आली आहे.
अलवर- जगद्गुरु रामानुजाचार्य स्वामी कौशलेंद्र प्रपन्नाचारी फलाहारी महाराजला शनिवारी अलवर येथून अटक करण्यात आली आहे. फलाहारी महाराजावर बलात्काराचा आरोप आहे. काही दिवसांपूर्वीच महाराजाविरुद्ध छत्तीसगडमधील बिलासपूर येथील एका तरुणीने बलात्काराचा आरोप केला होता. त्यानंतर छत्तीसगड पोलीस अलवर येथे येणार असल्याचे कळताच फलाहारी महाराजाच्या पायाखालची वाळू सरकली. त्याने तत्काळ आश्रम सोडला आणि एका खासगी हॉस्पिटलमध्ये अॅडमिट झाला.
शनिवारी अटक केल्यानंतर पोलिसांनी त्याला सरकारी हॉस्पिटलमध्ये शिफ्ट केले आहे. बलात्काराच्या आरोपात अटक करण्यात आलेल्या फलाहारी महाराजाची पोटेंसी टेस्ट करण्यात आली असून ती पॉझिटीव्ह आली आहे. फलाहारी महाराजाच्या मधुसूदन सेवाश्रमातील ती रूम सील करण्यात आली आहे, जिथे महाराजाने तरुणीसोबत कुकर्म केले होते. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तरुणीच्या कुटुंबाचे बाबासोबत २५ वर्षे जुने संबंध होते. तरुणी लॉचे शिक्षण घेत होती. लॉ झाल्यानंतर तिने इंटर्नशिप पूर्ण केले. त्याचे तिला ५ हजार रुपये मिळाले. आयुष्यातील या पहिल्या कमाईने तरुणी आनंदात होती. हाच आनंद फलाहारी महाराजांसोबत शेअर करण्यासाठी ती ७ ऑगस्टला अलवर येथील आश्रमात आली होती. सायंकाळी महाराजाने तिला मंदिरातील बेसमेंटमध्ये असलेल्या एका रुममध्ये राहाण्यास सांगितले.
येथील लोकांना महाराजाने मंदिरात आरतीसाठी जाण्यास सांगितले. त्यानंतर महाराजाने गेट बंद करून घेतले आणि तरुणीसोबत अश्लील गप्पा मारत तिची छेड काढायला लागला आणि त्यानंतर बलात्कार केला. अलवरचे अतिरिक्त पोलीस आयुक्त पारस जैन म्हणाले, फलाहारी महाराजावर गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे.
[EPSB]
पाकिस्तानच्या नौदलाने अरबी समुद्राच्या उत्तर भागात एका क्षेपणास्त्राची चाचणी केली आहे. ‘एअर टू सरफेस’ अर्थात हवेतून जहाजाकडे मारा करणारे हे क्षेपणास्त्र आहे.
[/EPSB]