सोने खरेदीसाठी उत्तम मुहूर्त समजल्या जाणा-या नवरात्री आणि दस-यादरम्यान सोने खरेदीत यंदा कमालीची घट झाली.
कोलकाता- सोने खरेदीसाठी उत्तम मुहूर्त समजल्या जाणा-या नवरात्री आणि दस-यादरम्यान सोने खरेदीत यंदा कमालीची घट झाली. मागील वर्षीच्या तुलनेते यंदा सोने खरेदीत सुमारे ५० टक्के घट झाली. सणांच्या दिवसांत सोने खरेदीकडे लोकांचा ओढा असतो. मात्र, यंदा ग्राहकांनी सोने खरेदीकडे पाठ फिरवल्याचे चित्र दिसले. हेच चित्र दिवाळीतही कायम राहण्याची शक्यता आहे.
दस-याच्या दिवशी ग्राहकांनी टीव्ही, फ्रिज आदी गृहपयोगी वस्तूंची खरेदी केली. मागील वर्षाच्या तुलनेने यंदाच्या वर्षात १५ टक्के अधिक विक्री झाली. दिवाळीतही हाच ट्रेंड कायम राहण्याची चिन्हे आहेत. यावेळी सुरुवातीपासूनच सोन्याच्या मागणीत घट होती. सोन्याची तस्करी वाढल्याने किमतीत काहीशी घट झाली असली तरी खरेदीत फारशी वाढ झाली नसल्याचे एका विक्रेत्याने सांगितले.
सोन्यावर १० टक्के आयात शुल्क आणि ३ टक्के जीएसटी लागू असल्याने सोन्याची तस्करी वाढली असल्याचे विक्रेत्याने सांगितले. सरकारने ५० हजारहून अधिक किमतीच्या सोने खरेदीसाठी ग्राहकांनी माहिती देणे सक्तीचे केल्याचा परिणाम सोने खरेदीवर झाला असल्याची चर्चा सुरू आहे.
[EPSB]
रिचर्ड थेलर यांना अर्थशास्त्राचा नोबेल पुरस्कार
[/EPSB]