बलात्कारी राम रहीमची खास हनीप्रीत नेपाळमध्ये पळून गेली आहे. उदयपूरहून अटक करण्यात आलेल्या डेरा मेंबर प्रदीप गोयल उर्फ विक्कीने हा दावा केला आहे.
पंचकुला- बलात्कारी राम रहीमची खास हनीप्रीत नेपाळमध्ये पळून गेली आहे. उदयपूरहून अटक करण्यात आलेल्या डेरा मेंबर प्रदीप गोयल उर्फ विक्कीने हा दावा केला आहे. काही दिवसांपूर्वीच पोलिसांना प्रदीपसह हनीप्रीतची लोकेशन उदयपूरच्या एका मॉलमध्ये आढळली होती. याआधारे पोलिसांनी प्रदीपचा माग काढला. तथापि, दोन साध्वींवरील बलात्कार प्रकरणात राम रहीमला २० वर्षाची शिक्षा झालेली आहे.
शिक्षेच्या सुनावणीवेळी हनीप्रीत त्याच्यासोबतच होती, बाबासह ती तुरुंगापर्यंत हेलिकॉप्टरमध्ये बसून आली होती. तेथून परतल्यानंतर हनीप्रीतचा ठावठिकाणा लागला नाही. हनीप्रीतवर बाबाला पळून जाण्याचा कट रचणे आणि दंगे घडवून आणण्याचा कट रचल्याचा आरोप आहे. राम रहीमच्या आदेशावरून प्रदीप उदयपुरात राहत होता. पोलिस सूत्रांनुसार, प्रदीप गोयल हरियाणाचाच राहणारा आहे, परंतु राम रहीमच्या आदेशावरून तो उदयपूरमध्ये राहत होता. चौकशीसाठी त्याला पोलिसांनी पंचकुला नेले आहे. हनीप्रीत मागच्या अनेक दिवसांपासून उदयपुरात राहत आहे.
तेथील सेलेब्रेशन मॉलमध्ये प्रदीपसह तिची लोकेशनही ट्रेस झाली होती. याआधारेच तिथे पोलीस गेले, परंतु हनीप्रीत आढळली नाही, प्रदीप मात्र अलगद जाळ्यात अडकला. त्याने सांगितले की, हनीप्रीत नेपाळमध्ये पळून गेली आहे. पोलिसांनी प्रदीपचा मोबाइल जप्त केला आहे. ज्यात राम रहीम आणि हनीप्रीतशी निगडित महत्त्वाचे धागेदोरे मिळण्याची शक्यता आहे. सूत्रांनुसार, राम रहीमवरील शिक्षेच्या सुनावणीच्या दिवशी राजस्थानहून १५ ते २० बसेस भरून पंचकुलामध्ये माणसे जमली होती. यातील २ बसेस उदयपुरातून आल्या होत्या.
प्रदीप उदयपुरात राम रहीमच्या भक्तांचे नेटवर्क पाहायचा. राजस्थानातून बसेस नेण्याची जबाबदारी त्याच्याच खांद्यावर होती. प्रदीप मोठी गर्दी जमवण्यासाठी आदिवासी भागांना आमिष दाखवले होते, म्हटले होते की, बाबाच्या डेऱ्यात गेल्यावर प्रत्येकाला २५ हजार देण्यात येतील. दंगा भडकवण्यासाठी २ ते ३ दिवस आधीच या बसेस हरियाणासाठी रवाना झाल्या होत्या.
[EPSB]
[/EPSB]