देशातील सार्वजनिक क्षेत्रातील तेल वितरण कंपनी इंडियन ऑईल कॉर्पोरेशनने महसुलाबाबत पाकिस्तानला मागे टाकले आहे.
नवी दिल्ली- देशातील सार्वजनिक क्षेत्रातील तेल वितरण कंपनी इंडियन ऑईल कॉर्पोरेशनने महसुलाबाबत पाकिस्तानला मागे टाकले आहे. २०१५मध्ये इंडियन ऑईल कॉर्पोरेशनचा महसूल हा पाकिस्तानपेक्षा ४० टक्के जास्त होता. कंपनीचे महसुली उत्पन्न ५४.७ अब्ज डॉलर होते. तर पाकिस्तानचे महसुली उत्पन्न ३८.७ अब्ज डॉलर होते.
ब्रिटनची संस्था ‘ग्लोबल जस्टिस नाऊने नुकत्याच केलेल्या एका सव्र्हेक्षणात ही माहिती दिली. विशेष म्हणजे, महसुली उत्पन्नामध्ये असलेल्या टॉप १०० मधील ६९ कंपन्यांचे उत्पन्न अनेक देशांच्या उत्पन्नापेक्षा अधिक आहे.
या सव्र्हेक्षणानुसार, जगातील १० मोठया कंपन्यांची कमाई ही अनेक देशांच्या संयुक्त कमाईपेक्षाही जास्त आहे. वॉलमार्ट, अॅपल, शेल या तिन्ही कंपन्यांचा एकूण महसूल हा १८० गरीब देशांच्या एकूण उत्पन्नापेक्षा जास्त आहे. या गरीब देशांमध्ये दक्षिण आफ्रिका, इराक, आर्यलड, इंडोनेशिया, इस्रयल, कोलंबिया, ग्रीस आणि व्हिएतनाम आदी देशांचा समावेश आहे.
बडया कंपन्यांकडे असलेल्या अफाट संपत्तीबद्दल बोलताना ‘ग्लोबल जस्टिस नाऊ’चे संचालक नीक डियरडेन म्हणाले की, मोठया कंपन्यांकडे इतकी गडगंज संपत्ती आणि ताकद असणे हे जगातील अनेक समस्यांचं मुख्य कारण आहे.
स्वत:च्या फायद्यासाठी या कंपन्या मूलभूत मानवी हक्क दडपतात. या मोठया कंपन्यांची मदत करू नये यासाठी ही संस्था ब्रिटन सरकारवर सातत्याने दबाव आणत आहे.