४जी सेवेसाठी देण्यात येणा-या वेगाच्या यादीत रिलायन्स जिओ शेवटच्या क्रमांकावर असल्याची माहिती दूरसंचार नियामक प्राधिकरणाच्या (ट्राय) संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे.
मुंबई- ४जी सेवेसाठी देण्यात येणा-या वेगाच्या यादीत रिलायन्स जिओ शेवटच्या क्रमांकावर असल्याची माहिती दूरसंचार नियामक प्राधिकरणाच्या (ट्राय) संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे.
एअरटेल, व्होडाफोन, आयडिया सेल्युलर आणि रिलायन्स कम्युनिकेशन्स या नेटवर्कवर मिळणारा ४जी सेवेचा वेग हा रिलायन्स जिओकडून पुरवण्यात येणा-या ४जी सेवेच्या वेगापेक्षा अधिक असल्याचे त्यात नमूद करण्यात आले आहे.
ट्रायने दिलेल्या माहितीनुसार ४जी सेवा पुरवणा-या कंपन्यांमध्ये ४जी सेवेचा सर्वाधिक ११.७ एमबीपीएसचा वेग भारती एअरटेल देत असल्याची माहिती मिळाली आहे, तर दुस-या क्रमाकांवर रिलायन्स कम्युनिकेशन्सचा क्रमांक लागतो.
रिलायन्स जिओच्या अभियंत्यांनी ट्रायकडून करण्यात आलेल्या चाचणीचे निकाल मानण्यास असमर्थता दर्शवली आहे. हे सर्व निकाल पक्षपाती असल्याचे कंपनीकडून सांगण्यात आले.