महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात येणा-या राज्य उत्पादन शुल्क (गट-क) अंतर्गत दुय्यम निरीक्षकाच्या ३०० जागांसाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत.
राज्य उत्पादन शुल्कमध्ये दुय्यम निरीक्षकाच्या जागा
महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात येणा-या राज्य उत्पादन शुल्क (गट-क) अंतर्गत दुय्यम निरीक्षकाच्या ३०० जागांसाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख २ फेब्रुवारी अशी आहे. अधिक माहितीसाठी https://mahampsc. mahaonline.gov.in किंवा www.mpsc.gov.in यावर संपर्क साधू शकता.
सेंटर फॉर रेल्वे इन्फॉर्मेशन सिस्टीममध्ये अभियंता पदाच्या जागा
सेंटर फॉर रेल्वे इन्फॉर्मेशन सिस्टीम (CRIS)मध्ये ज्युनिअर सॉफ्टवेअर इंजिनीअर (४० जागा), ज्युनिअर नेटवर्क इंजिनीअर (१४ जागा) अशा एकूण ५४ जागांसाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याची अंतिम तारीख ८ फेब्रुवारी आहे. अधिक माहिती www.cris.org.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळात पर्यवेक्षकीय पदांच्या ४८३ जागा
महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळात सहाय्यक वाहतूक कनिष्ठ अधीक्षक (२५ जागा), कनिष्ठ वाहतूक निरीक्षक (१४८ जागा), कनिष्ठ लेखाकार (६३ जागा), कनिष्ठ भांडार पर्यवेक्षक (२ जागा), कनिष्ठ भांडारपाल (४० जागा), कनिष्ठ सुरक्षा निरीक्षक (१२ जागा), कनिष्ठ सहा.सुरक्षा निरीक्षक (२२ जागा), कनिष्ठ आगरक्षक (१ जागा), कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) (४६ जागा), कनिष्ठ अभियंता (विद्युत) (७ जागा), कनिष्ठ सहा.कार्य.अधीक्षक /तांत्रिक सहाय्यक (९२ जागा), प्रभारक (१० जागा), वरिष्ठ संगणक चालक /विभागीय संगणक पर्यवेक्षक (१५ जागा) अशा एकूण ४८३ जागांसाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याचा कालावधीत ३ फेब्रुवारी आहे. अधिक माहिती https://msrtc.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
इंडियन रेअर अथ्र्स लिमिटेडमध्ये कार्यकारी सहाय्यक पदाची जागा
इंडियन रेअर अथ्र्स लिमिटेडमध्ये कार्यकारी सहाय्यक पदासाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याची अंतिम तारीख २३ जानेवारी २०१७ आहे. अधिक माहिती www.irel.co.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळात विविध पदांच्या जागा
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळात कनिष्ठ चालक तथा वाहक (७९२९ जागा), कनिष्ठ लिपिक-टंकलेखक (२५४८ जागा), कनिष्ठ सहाय्यक (३२९३ जागा), कनिष्ठ पर्यवेक्षकीय (४८३ जागा) अशा एकूण १४२५३ जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाली असून अधिक माहिती महामंडळाच्या www.msrtc.gov.in व msrtcexam.in या संकेतस्थळावर संपर्क साधावा.
सशस्त्र सीमा दलात विविध पदांच्या जागा
केंद्रीय गृह विभागाअंतर्गत सशस्त्र सीमा दलात उप-निरीक्षक (समन्वय) (१६ जागा), सहाय्यक उप-निरीक्षक (समन्वय) (११० जागा), मुख्य कॉन्स्टेबल (समन्वय) (७४६ जागा) अशा एकूण ८७२ जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत.