‘एलजी व्ही ३०’ असे या स्मार्टफोनचे नाव असून याबरोबरच ‘एलजी व्ही ३० प्लस’ हा स्मार्टफोनदेखील लाँच केला आहे.
नवी दिल्ली- एलजी मोबाईल कंपनीने आपला नवा स्मार्टफोन लाँच केला आहे. ‘एलजी व्ही ३०’ असे या स्मार्टफोनचे नाव असून याबरोबरच ‘एलजी व्ही ३० प्लस’ हा स्मार्टफोनदेखील लाँच केला आहे. हे दोन्ही स्मार्टफोन २१ सप्टेंबरला विक्रीसाठी कंपनीच्या वेबसाईटवर उपलब्ध करण्यात येणार आहे.
एलजीचे हे दोन्ही स्मार्टफोन लवकरच भारतात लाँच होणार आहेत. मात्र कंपनीने या स्मार्टफोनची किंमत गुलदस्त्यात ठेवणे पसंत केले आहे. या स्मार्टफोनमध्ये दोन रेअर कॅमेरे देण्यात आले आहेत. हा स्मार्टफोन सिल्वर, काळा आणि निळ्या रंगामध्ये उपलब्ध करण्यात आला आहे.
‘एलजी व्ही ३०’ स्मार्टफोनचे फिचर्स ?
» सहा इंचाचा डिस्प्ले
» चार जीबी रॅम
» ऑक्टा-कोर प्रोसेसर
» ३२ जीबी इंटरनल मेमरी
» १४४० X २८८० पिक्सल स्क्रिन रेझ्योल्यूशन
» १६ मेगापिक्सेल रेयर कॅमेरा
» पाच मेगापिक्सल फ्रंट कॅमेरा
» अँड्रॉईड ७.१.२. नुगट
» ३००० एमएएच बॅटरी