भारतातील आघाडीची आणि ५० वर्ष जुनी ऑर्थोपेडिक उत्पादन कंपनी व्हिस्कोने भारतातील पहिली, नव्या युगाचे लूप इस्टिक तंत्रज्ञान असलेली व्हिस्को प्रो श्रेणी लाँच केली आहे. त्यात सोळा वेदनाशामक उत्पादनांचा समावेश आहे.
व्हिस्को प्रो आता इलॅस्टिकवर कुठेही चिकटवता येईल किंवा वेलक्रोच्या साहाय्याने जोडून शरीराला व्यवस्थित आधार देता येईल. ही उत्पादने वैद्यकीयदृष्टया प्रभावी सिद्ध झालेली असून ती दिसायला आकर्षक आहेत.
नव्याने लाँच केलेली उत्पादन श्रेणी शारीरिकदृष्टया अपंग, ज्येष्ठ नागरिक आणि खेळाडूंसाठी दिवाळीनिमित्त २० टक्के सवलतीत उपलब्ध आहे. उत्पादन नोंदणीसाठी कंपनीच्या (www.vissco.com/order ) संकेतस्थळावर संपर्क साधता येईल.
वापरणा-याचा आरामदायीपणा लक्षात घेऊन आणि आघाडीच्या आंतरराष्ट्रीय डिझाईन तज्ज्ञांचा सल्ला घेऊन व्हिस्को प्रो तयार करण्यात आली आहे. यासाठी वापरण्यात आलेले साहित्य त्वचास्नेही आणि मोकळेपणा असणारे आहे. या श्रेणीत वेदनेपासून मुक्ती देणा-या विविध उत्पादनांचा समावेश आहे.
त्यात पाठीसाठी (लम्बोसेट), ओटीपोट (अब्डोसेट), गुडघा (स्प्रो प्लस, थ्रीडी व टुडी आणि जेल पॅडिंग शिवाय), घोटयासाठी (अँकलर आणि रिजिट अँक ब्रेस), खांद्यासाठी (झीरो मोशन इममोबिलायझर, आर्म पाउच िस्लग) आणि कोप-यासाठी (टेनिस एल्बो) यांचा समावेश आहे.
व्हिस्को संचालक, सौमिल गांधी म्हणाले, ‘आम्ही आतापर्यंत पाठ, मान, घोटा, मनगट आणि कोप-याच्या दुखापतींशी संबंधित ३३ मिलियन केसेस हाताळल्या आहेत. लोक वाढत्या संख्येने ऑर्थोपेडिक उत्पादनांकडे वळत असून या उत्पादनांचे तंत्रज्ञानही झपाटयाने सुधारत आहे.
कंपनी नावीन्यावर विश्वास असून ‘लोकांना आणि त्यांच्या प्रियजनांना सक्षम करून वेदनेचा कमीत-कमी त्रास होईल असे पाहाणे’ या तत्त्वावर कंपनीची स्थापना करण्यात आली होती. लूप इलॅस्टिक तंत्रज्ञान असलेली भारतातील पहिली, प्रवर्तक उत्पादन श्रेणी लाँच करताना आम्हाला आनंद होत आहे.
समाजाची सेवा करण्याची संधी मिळाली हे आमचे भाग्य आहे आणि भारत वेदनामुक्त करण्याचे आमचे ध्येय साकार व्हावे, अशी आशा करतो.’