क्रिकेटच्या जगात आपल्या फलंदाजीने भल्या भल्यांना पाणी पाजणा-या महेंद्रसिंग धोनीने कोणत्या गोलंदाजाचा सामना करणे कठीण होते हे सांगितले.
लंडन- क्रिकेटच्या जगात आपल्या फलंदाजीने भल्या भल्यांना पाणी पाजणा-या महेंद्रसिंग धोनीने कोणत्या गोलंदाजाचा सामना करणे कठीण होते हे सांगितले. लंडनमध्ये सोमवारी भारतीय कर्णधार विराट कोहलीने एका चॅरिटी डिनर पाटीचे आयोजन केले होते. या पार्टीत तो बोलत होता.
”माज्याकडे असलेल्या मर्यादित टेकनिकमुळे सर्व प्रकारच्या जलद गोलंदाजांचा सामना करणे अवघड जाते, फास्ट बॉलरचा सामना करणे नेहमी कठीण असेत, पण मला जर एका गोलंदाजाचे नाव घ्यायचे असेल तर मी शोएब अख्तरचे नाव घेईल. यामागे साधे कारण आहे, तो खूप फास्ट बॉलिंग करायचा , तो यॉर्कर टाकू शकत होता, बाउन्सरही टाकायचा त्याच्याविरोधात खेळताना पुवार्नुमान लावणे कठीण असायचे, त्यामुळे अख्तरविरोधात खेळताना मजा यायची”. असे धोनीने यावेळी सांगितले.
या पार्टीत भारतीय संघाचे सर्व खेळाडू, कोच अनिल कुंबळे आणि सपोर्ट स्टाफनेही हजेरी लावली होती. या कार्यक्रमादरम्यान कार्यक्रमाचे होस्ट अॅलन विल्किन्स यांनी धोनीला करिअरमध्ये कोणत्या गोलंदाजाचा सामना करणे कठीण होते हा प्रश्न विचारला होता. त्यावेळी धोनीने हा खुलासा केला. तसेच त्यांनी धोनीला ‘इतक्या वर्षांपासून क्रिकेट खेळतोय तर तुला डकवर्थ लुईस समजतो का?’ असा प्रश्नही केला. यावर मिश्किल उत्तर देताना स्वत: आयसीसीलाही हा नियम समजत असेल असं मला वाटत नाही असं धोनी म्हणाला.