भारत मॅट्रिमोनी या आघाडीच्या ऑनलाईन मॅचमेकिंग सेवेने प्रोग्रेसिव्ह वेब अॅप सादर केल्याची घोषणा केली.
मुंबई- भारत मॅट्रिमोनी या आघाडीच्या ऑनलाईन मॅचमेकिंग सेवेने प्रोग्रेसिव्ह वेब अॅप सादर केल्याची घोषणा केली. हे कमी बँडविड्थ असलेल्या साध्या स्मार्टफोन्सवरही अॅप लाईक अनुभव देते. हे वेब अॅप लगेच लोड होते आणि उत्कृष्ट अशा युजर इंटरफेस (यूआय) ने उत्तम अनुभव देते तसेच उपभोक्ताचे डेटा कंजम्पशनही कमी करते.
मोबाईलवरून सुमारे ८०% प्रोफाईल्स पहिले जातात आणि त्यातही २जी नेटवर्कवरून लक्षात घेण्याजोग्या हिट्स असतात, त्यामुळे आपल्या जीवनसाथीच्या जलद शोधासाठी हे पाऊल खूप महत्त्वाचे आहे. टायर २ आणि टायर ३ शहरांमध्ये जेथे कमी बँडविड्थचे नेटवर्क असते. त्या शहरांसाठी हा एक मोठा लाभ आहे, कारण पीडब्ल्यूए अपु-या नेटवर्कमध्येही जलद लोडिंग देते.
[EPSB]
जवाहर दीप येथे इंधन टाकीला भीषण आग
भाऊच्या धक्क्यापासून अवघ्या काही अंतरावर समुद्रात असणा-या जवाहर दीप बेटावरील डिझेल टँकच्या परिसरात इंधनाच्या टाकीला शुक्रवारी सायंकाळी लागलेल्या भीषण आगीचे अग्नितांडव शमवण्याचे शर्थीचे प्रयत्न अद्यापही सुरू आहेत.
[/EPSB]