चीनी स्मार्टफोन कंपनी लिनोओने आणखी एक नवा बजेट स्मार्टफोन ‘मोटो जी ५’ भारतात दाखल केला आहे. ‘
नवी दिल्ली- चीनी स्मार्टफोन कंपनी लिनोओने आणखी एक नवा बजेट स्मार्टफोन भारतात दाखल केला आहे. ‘मोटो जी ५’ या स्मार्टफोनची किंमत अवघी ११ हजार ९९९ रुपये आहे. या स्मार्टफोनची विक्री मंगळवारी रात्री १२ वाजता सुरू करण्यात येणार आहे.
‘मोटो जी ५’ या स्मार्टफोनची विक्री अॅमेझॉन या शॉपिंग साईटवर सुरू करण्यात येणार आहे. याबरोबर कंपनीने ग्राहकांसाठी आणखी काही ऑफर ठेवल्या आहेत. सध्या हा स्मार्टफोन ग्रे आणि गोल्ड रंगामध्ये उपलब्ध आहे.
नवी दिल्ली येथे आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमात लिनोओने आपला हा स्मार्टफोन लॉच केला आहे.
काय आहेत ‘मोटो जी ५’ या स्मार्टफोनचे फिचर्स ?
» पाच इंच डिस्प्ले
» १.४ गिगाहर्टझ ऑक्टाकोर प्रोसेसर
» अॅन्ड्रोईड ७.० मार्शमॅलो
» तीन जीबी रॅम
» १६ जीबी इंटरनल मेमरी
» १०८०X१९२० पिक्सल स्क्रिन रेझ्योल्यूशन
» १३ मेगापिक्सेल रेअर कॅमेरा
» पाच मेगापिक्सेल फ्रंट कॅमेरा
» २८०० एमएएच बॅटरी
» किंमत –११ हजार ९९९ रुपये.