मुंबई म्हणजे लाखो लोकांची रोजीरोटी असं आपण म्हणतो. नोकरी, व्यवसायासाठी भारताच्या कानाकोपऱ्यांतून लोक या शहरात येत असतात. त्यामुळे या शहराविषयी प्रत्येकालाच कुतूहल आहे. भारताच्या कानाकोपऱ्यांतून आलेले लोक मुंबईच्या प्रत्येक विभागात राहतात. त्यामुळे मुंबई हे कॉस्मेपॉलिटीन शहर म्हणूनही ओळखलं जातं. त्याचप्रमाणे मुंबईत विविध जातीधर्माचे लोक राहत असल्याने त्यांनी त्यांची खाद्यसंस्कृतीही येथे जोपासली आहे.
शहरीकरण वाढत गेलं, त्याचप्रमाणे येथे हॉटेल्स, रेस्टॉरंट्सही वाढत गेले. ग्राहकांच्या चवीप्रमाणे हॉटेल्सवाल्यांनीही त्यांना हव्या त्या डीश उपलब्ध करून दिल्या आहेत. मात्र ‘गॉर्ब’ने कोणत्या विभागात काय जास्त खाल्लं जातं, कोणत्या विभागात शाकाहारी खवय्ये आहेत, मासांहारी खवय्ये किती अशी सारी रंजक माहिती उपलब्ध करून दिली आहे.
दररोज हजारो ग्राहकांपर्यंत पोहोचणारं ‘गॉर्ब’ सध्या आघाडीच्या फूड अॅग्रीगेटरपैकी एक आहे. जवळपास ३५० शेफ्स यामध्ये आहेत. गेल्या सहा महिन्यांमध्ये दर महिन्याला एक लाखांहून अधिक जेवण या ब्रॅण्डने ग्राहकांपर्यंत पोहोचवली आहेत. त्यादरम्यान ब्रॅण्डला अशी काही रंजक माहिती मिळाली ज्यामुळे मुंबईकरांच्या खाण्याच्या सवयी माहीत पडल्या.
इडली वडयापासून बन-मस्का, सॅलड, सूपपासून मार्शमेलोपर्यंत, मुंबईकरांना काय आवडते ते पुढीलप्रमाणे:
३५ टक्के लोक पोर्क आणि चिकनपेक्षा मटण खाण्यास प्राधान्य देतात. गेल्या ६ महिन्यांमध्ये २१ ते २९ वयोगटातल्या ३००० हून अधिक लोकांना मटणाचे पदार्थ मागवले होते.
मध्य मुंबई (मुलुंड, माटुंगा आणि चेंबूर) भागातले खवय्ये शाकाहारी पदार्थावर ताव मारतात. गंमतीचा भाग म्हणजे मागवल्या जाणा-या एकूण शाकाहारी पदार्थापैकी १९ टक्के पदार्थ हे या भागांमधून मागवले जातात, म्हणजेच जवळपास १९ टक्के ऑर्डर या भागातून असते. या भागातून मागवल्या जाणा-या पदार्थापैकी ७५ टक्के पदार्थामध्ये मशरूम आणि पनीर असतं. घाटकोपरमधून मागवल्या जाणा-या ऑर्डर्सपैकी ६३ टक्के ऑर्डर्समध्ये चिकन हा महत्त्वपूर्ण घटक असतो.
ग्रँट रोड, कांजूरमार्ग आणि मुंबई सेट्रल परिसरातल्या ग्राहकांना मासे खूप आवडतात. मागवल्या जाणा-या माशांच्या पदार्थाच्या एकूण पदार्थापैकी २६ टक्के पदार्थ हे या भागांतून मागवले जातात.
२१ ते २९ वयोगटातल्या पुरुष ग्राहकांमार्फत मागवल्या जाणा-या ऑर्डर्सपैकी ५६ टक्के ऑर्डर्स या मांसाहारी पदार्थाच्या असतात. प्रभादेवी, सायन आणि माहीम या भागांतून मागवल्या जाणा-या सर्व शाकाहारी पदार्थापैकी २९ टक्के पदार्थ हे ३५ वर्षापेक्षा जास्त वयाचे पुरुष ग्राहक आहेत. २८ ते ३५ वयोगटातल्या महिला ग्राहक या जास्तकरून एगलेस डेझर्टस मागवतात. गेल्या महिन्यात मागवल्या गेलेल्या सर्व एगलेस डेझर्टसपैकी ६६ टक्के एगलेस डेझर्टस होती.
वांद्रे भागातल्या ग्राहकांचा कल हा हेल्दी पदार्थ मागवण्याकडे आहे. रंजक बाब म्हणजे ‘हेल्थ’ विभागांतर्गत मागवल्या जाणा-या पदार्थापैकी १६ टक्के पदार्थ हे या भागातून मागवले जातात. दक्षिण मुंबईतले मारवाडी आणि सिंधी ग्राहक सर्वोत्तम एक्झॉटिक पदार्थ मागवतात. मागवल्या जाणा-या एकूण पदार्थापैकी ३० टक्के पदार्थामध्ये क्विनोआ, अॅव्हॅकॅडो आदींचा समावेश असतो. या अभ्यासाबाबत बोलताना गॉर्बचे सीईओ श्री. पीयूष शर्मा म्हणाले, ‘या सव्र्हेतून मिळालेली रंजक माहिती ही गॉर्बच्या अंतर्गत डेटामधून मिळाली असून गेल्या सहा महिन्यांमध्ये ५ लाखांहून अधिक ग्राहकांनी मागवलेल्या ऑर्डर्सवर ती आधारित आहे.
गेल्या काही महिन्यांमध्ये आम्ही मुंबईतल्या बहुतेक सर्व कानाकोपऱ्यांमध्ये ऑर्डस पोहोचवल्या आहेत. दर महिन्याला आम्ही मुंबईकरांना जवळपास एक लाखांहून अधिक डिलिव्हरीज देतो. शहरातल्या वेगवेगळ्या भागांची पसंती, आवड जाणून घेणं खरंच खूप रंजक असतं. या माहितीमुळे मुंबईकरांच्या खाण्यापिण्याच्या सवयी आम्हाला समजून घेता आल्या. येत्या काही महिन्यांमध्ये आम्ही अधिकाधिक ग्राहकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करू.
संशोधन कसं केलं?
संशोधन फूड ट्रेण्डस गॉर्बच्या अंतर्गत डेटावर आधारित आहे. जुलै २०१६ ते जानेवारी २०१७ या कालावधीत ५ लाखांहून अधिक ग्राहकांनी मागवलेल्या ऑर्डर्सवर ती आधारित आहे.