नाशिक- पावसामुळे साचलेल्या पाण्यात पोहून शिवसैनिकांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली.
नाशिकमध्ये मुसळधार पावसामुळे अनेक भागात पाणी साचले आहे. त्यामुळे शिवसेनेने अनोखे आंदोलन करून तुंबलेल्या पाण्याला फडणवीस वॉटर पार्क असे नाव दिले आहे.
नाशिकमध्ये गुरूवार रात्रीपासून मुसळधार पावसामुळे रस्त्यांना नद्यांचे स्वरूप आले आहे. पावसामुळे महापालिकेच्या सातपूर विभागीय कार्यालयासमोरच्या त्र्यंबकेश्वर रोडवर पाणी साचले आहे. या निषेध करत शिवसैनिकांनी आंदोलन केले.
त्र्यंबकेश्वर रोडवर पाणी साचलेल्या पाण्यात पोहत शिवसैनिकांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली. तसेच त्यांनी नाशिकला दत्तक घेतलेल्या मुख्यमंत्र्यांचे अभिनंदन करणारा फलकही आंदोलकांनी हाती घेतला होता.