हिंगोली जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेत संगणक प्रोग्रामर पदासाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याची अंतिम तारीख १३ ऑक्टोबर आहे.
हिंगोली जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेत संगणक प्रोग्रामर पदाची भर्ती
हिंगोली जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेत संगणक प्रोग्रामर पदासाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याची अंतिम तारीख १३ ऑक्टोबर आहे. अधिक माहिती www.hingoli.nic.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
युवा विकास व्यावसायिकासाठी जागा
उमेद-महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान अंतर्गत युवा विकास व्यावसायिक पदाच्या ३ जागा कंत्राटी पद्धतीने भरण्यासाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याची अंतिम तारीख १९ ऑक्टोबर आहे. अधिक माहिती www.umed.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
भारतीय स्टेट बँकेत विशेषज्ञ अधिकारीसाठी जागा
भारतीय स्टेट बँकेत सहाय्यक व्यवस्थापक -१८० जागा, विकासक – ५० जागा, टेस्ट लिड -३ जागा, टेस्टर -१७ जागा, व्यवस्थापक (स्टॅटिस्टेशिअन) -७ जागा, सहायक व्यवस्थापक (स्टॅटिस्टेशिअन) – २० जागा, तंत्रज्ञान संपर्क व्यवस्थापक – ४ जागा, प्रशासन समर्थन अधिकारी – १ जागा, अॅप्लिकेशन आर्किटेक्ट – २ जागा, बिझनेस आर्किटेक्ट- १ जागा, डेटा वेअरहाऊस आर्किटेक्ट- १ जागा, एन्टरप्राईज आर्किटेक्ट- २ जागा, इन्फ्रास्ट्रक्चर आर्किटेक्ट -६ जागा, पोर्टल आर्किटेक्ट -१ जागा, टेक्नॉलॉजी आर्किटेक्ट-५ जागा, अभियंता -१४ जागा, तक्रार निवारण अधिकारी-२ जागा, माहिती तंत्रज्ञान जोखीम व्यवस्थापक -२ जागा, माहिती तंत्रज्ञान सुरक्षा तज्ज्ञ- २ जागा, प्रकल्प व्यवस्थापक – २९ जागा, बिझनेस अॅनॅलिस्ट – १८ जागा, विकासक- २२ जागा, इनोव्हेशन स्टेशालिस्ट- ५ जागा, डेटा सायंटिस्ट- ३ जागा, सोìसग अॅनालिस्ट -१ जागा, यूएक्स डिझायनर – १ जागा, अॅडमिनिस्ट्रेटर – १ जागा अशा एकूण ४०० जागांसाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याची अंतिम तारीख २२ ऑक्टोबर आहे. अधिक माहिती www.sbi.co.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
जेएनपीटीमध्ये पायलटसाठी जागा
जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्टमध्ये पायलट – ३ जागा पदासाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याची अंतिम तारीख २४ ऑक्टोबर आहे.
अधिक माहिती www.jnport.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
बेस्टमध्ये सहाय्यक अभियंता पदासाठी विशेष भरती मोहीम
बृहन्मुंबई विद्युत पुरवठा आणि परिवहन उपक्रमामध्ये सहाय्यक अभियंता (स्थापत्य) या पदाचा अनुसूचित जमातीचा अनुशेष भरून काढण्यासाठी विशेष भरती मोहीम राबविण्यात येत आहे. अधिक माहिती www.bestundertaking.com या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
सिव्हिल डिफेन्स सर्विसेसमध्ये जागा
सिव्हिल डिफेन्स सर्विसेसमध्ये कनिष्ठ लिपिक – २ जागा, न्हावी – १ जागा, संदेशवाहक – २ जागा अशा एकूण ५ जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याची अंतिम तारीख ३१ ऑक्टोबर आहे.
सुरक्षा मंत्रालय अंतर्गत मल्टी टास्किंग स्टाफसाठी जागा
सुरक्षा मंत्रालय अंतर्गत मल्टी टास्किंग स्टाफ (ऑफिस) पदाच्या दोन जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याची अंतिम तारीख २१ ऑक्टोबर आहे.