महापालिका निवडणुकीच्या महासंग्रामासाठीचा प्रचार संपल्यानंतर मंगळवारी निवडणुकीसाठी मतदान शांततेत पार पडले.
पुणे- महापालिका निवडणुकीच्या महासंग्रामासाठीचा प्रचार संपल्यानंतर मंगळवारी निवडणुकीसाठी मतदान शांततेत पार पडले.
शहरात ४१ प्रभागांतून १६२ जागांसाठी एक हजार ९० उमेदवार आपले नशीब आजमावत आहेत. दुपारी दीड वाजेपर्यंत ३०.३८ टक्के मतदान झाले होते. दुपारी उन्हामुळे मतदारांची संख्या रोडावली होती. तर दुपारी साडेतीन वाजेपर्यंत ४३ टक्के मतदान झाले होते.
दरम्यान, मतदानाचा टक्का वाढावा, यासाठी विविध संस्था, संघटना, हॉटेल, पेट्रोलपंप आदींनी विविध सवलती दिल्या गेल्या. तर मतदान केंद्राबाहेर उमेदवारांचे शिक्षण, मालमत्ता आणि गुन्ह्यांची माहिती पाहण्यासाठी मतदारांनी मोठी गर्दी केली होती.
महापालिकेच्या चाव्या आपल्या हातात याव्यात, यासाठी गेल्या १५ दिवसांपासून एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करणा-या राजकीय पक्षाचे भवितव्य ठरविण्यासाठी आज मतदारांनी आपल बहुमोल मतदान केले. पुण्यात सकाळपासून शहर, उपनगर परिसरात मतदान केंद्रावर मतदारांनी रांगा लागल्या होत्या. पहिल्यांदाच मतदान करणार्याचा उत्साह वाखाणण्याजोगा होता. शुक्रवार पेठेतील मृगनयनी मेंदी आर्टस् आणि बुधवार पेठेतील साईनाथ मंडळ ट्रस्टने अनोख्या उपक्रमाचे आयोजन केले होते. ‘बोटावरील शाईप्रमाणे हातावर मेंदी काढून लोकशाहीचा उत्सव साजरा करुया’, असा संदेश मतदान केंद्राबाहेर पडणार्या महिला मतदारांना देत त्यांच्या हातावर मेंदी काढून सन्मानित करण्यात आले. ज्याप्रमाणे बोटावर शाई लावून मतदारांना लोकशाही प्रक्रियेत सहभागी झाल्याबद्दल प्रोत्साहित केले जाते. त्याचप्रमाणे लोकशाहीमध्ये ५० टक्के सहभागी असणाजया महिला आणि तरुणींनी जास्तीत जास्त संख्येने मतदान करावे, यासाठी बोटावरील निळ्या शाईप्रमाणे नक्षीदार मेंदीने महिलावर्गाचा अनोखा सन्मान करण्यात आला. तर हॉटेलमध्ये बोटावरील शाई पुसेपर्यंत जेवणाच्या बिलात सवलती जाहीर करण्यात आल्या होत्या. तर बोटावरील शाई दाखवून कार वॉशिंगही मोफत करून दिले गेले.
दरम्यान, पालकमंत्री गिरीश बापट, त्यांच्या पत्नी, मुलगा गौरव, केंद्रीय मनुष्यबळ मंत्री प्रकाश जावडेकर, महापौर प्रशांत जगताप, संगीतकार सलील कुलकर्णी, अभिनेत्री सोनाली कुलकर्णी, सुयश टिळक, आर्या आंबेकर, श्रेया बुगडे, क्रिकेटपटू केदार जाधव यांनीही मतदान केले. या निडवणुकीत पुणेकर नक्कीच भाजपला निर्वविाद बहुमत देतील असा विश्वास बापट यांनी यावेळी व्यक्त केला. तर जावडेकर यांनी, लोकांनी जास्तीत जास्त संख्येने मतदान करण्यास आले पाहिजे आणि आपली लोकशाही बळकट केली पाहिजे, असे आवाहन केले. सलील कुलकर्णी यांनी, मतदान हा आपला हक्क आणि तो बजावला पाहिजे. तरच आपण सक्षम सरकार निवडून आणू, असा विश्वास व्यक्त केला.
भाजप कार्यकर्ते आढळले डेमो मशीन सोबत
भाजप कार्यकर्ते डेमो मशीन घेऊन आढळले. याप्रकरणी महर्शीनगर पोलीस ठाण्यात चौकशी करण्यात आली. प्रभाग क्र. ३३ मध्ये राष्ट्रवादीचे विकास गांगट आणि अक्रुर कुदळे पैसे वाटताना आढळले. तर वारज्यात मतदान केंद्रावर वाद झाल्यामुळे निवडणूक प्रक्रिया थांबवण्यात आली होती. शनिवार पेठ नवी मराठी शाळा येथील मतदान मशीनमध्ये बिघाड झाल्याने काही काळ गोंधळाचे वातावरण होते. कोंढवा मिठानगरमध्ये काही मतदारांच्या नावावर बोगस मतदान झाल्याचा प्रकार घडला. प्रभाग क्र. एकमधील बाबुराव टिंगरे शाळेत एका महिलेच्या नावाने बोगस मतदान झाल्याचे उघडकीस आले. सय्यदनगरमध्येही बोगस मतदानाचा प्रकार उघडकीस आल्याने कार्यकर्त्यांनी गोंधळ घातला. प्रभाग क्रमांक ९ मध्ये इतर पक्षाच्या उमेदाराने बाहेर गावाहून बोगस मतदार आणल्याचा आरोप भाजपा उमेदवार अमोल बालवडम्कर यांनी केला. तसेच बोगस मतदार आणणार्या तीन चारचाकी वाहनाच्या टायरची बालवडकर यांनी हवा सोडत बोगस मतदार आणणा-या उमेदवारावर कारवाई करण्याची मागणी केली.
दिव्यांग मतदारांनीही केले मतदान
ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांग मतदारांनीही उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. मतदान केंद्रापर्यंत जाण्यासाठी दिव्यांग आणि ज्येष्ठ नागरिकांच्या सोबत त्यांच्या ओळखीच्या व्यक्तींना जाण्यासाठी परवानगी दिल्यामुळे त्यांना मतदान करणे सोपे गेले. मात्र, काही ठिकाणी डोली किंवा व्हिल चेअर्स अशी कोणतीही सोय न केल्यामुळे अडचणींना सामोरे जावे लागले. मात्र, या अडचणींमुळेही न थांबता आपला मतदानाचा हक्क आवर्जून बजावण्यासाठी आलेले नागरिक मतदान केंद्रावर बघायला मिळाले. एकप्रकारे पुढील पिढीला आपला आदर्श घालत मतदानाचे आवाहन करत होते.
माजी महापौरांनी केली इव्हीएम मशीनची पूजा
पुण्यातील प्रभाग क्रमांक २२ या मतदान केंद्रावर माजी महापौर चंचला कोद्रे आणि माजी उपमहापौर बंडू गायकवाड यांनी चक्क इव्हीएम मशिनची पूजा करून वेगळाच पायंडा पाडला.
महापालिका निवडणुकीसाठी मंगळवारी मतदान सुरू होण्याच्या काही वेळ आधी प्रभाग क्रमांक 22 मधील एका मतदान केंद्रावर हा अजब प्रकार घडला. माजी महापौर असलेल्या व सध्या काँग्रेस पक्षाकडून निवडणूक लढणा-या चंचला कोद्रे आणि बंडू गायकवाड यांनी चक्क मतदान यंत्राची पूजा केली. प्रतिस्पर्धी पक्षाच्या उमेदवारांनी मात्र या प्रकाराला जोरदार आक्षेप घेतला आहे. राजकीय कार्यकर्त्यांना इतक्या मोठय़ा संख्येने मतदान यंत्राजवळ जाऊ कसे देण्यात आले, असा सवाल विरोधकांनी केला. याबाबत पुणे महापालिकेचे निवडणूक निर्णय अधिकारी सतीश कुलकर्णी यांनी या प्रकरणाची चौकशी करून योग्य ती कारवाई केली जाईल, असे आश्वासन दिले.
मतदानानंतर हात धुतल्यावर शाई पुसली गेली
शुक्रवार पेठेतील आदर्श विद्यालय या मतदान केंद्रावर बोटाला लावण्यात आलेली शाई हात धुतला की लगेच निघून गेल्याचे दिसून आले. प्रा. मंजुश्री जोशी यांनी सकाळी या मतदान केंद्रावर जाऊन मतदान केले. त्यानंतर शाई लावलेले बोट दाखवत त्यांनी सेल्फी काढला आणि फेसबुकवर पोस्टही केला. त्यानंतर त्यांनी घरी येऊन हात धुतला असता बोटाची शाई निघून गेली. ही गोष्ट निवडणूक अधिकार्याच्या ध्यानात आणून देण्यासाठी मंजुश्री जोशी पुन्हा मतदान केंद्रावर गेल्या. तेव्हा तिथे असलेल्या अधिकार्यानी त्यांच्या बोटाला पुन्हा दुसर्या बाटलीतील शाई लावली. मात्र, हात धुतला असता ती शाईदेखील निघून गेली. या मतदान केंद्रावर येणार्या इतर मतदारांनाही हा अनुभव आला.
मतदान यंत्र पूजन
पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी होणाऱ्या मतदानासाठी विद्यानगरी म्हणून गौरवले जाणरया पुण्यात माजी महापौर आणि उपमहापौरांनी मतदान यंत्राची पूजा केल्याने खळबळ उडाली आहे. याबाबत फोटो सोशल मिडीयावर व्हायरल होताच त्याच्या विरूध्द उलट सुलट चर्चा सुरू झाली आहे. दरम्यान मतदान यंत्राजवळ मोठय़ा प्रमाणात राजकीय कार्यकर्त्यांना एकावेळी जाऊ देण्याच्या या प्रकाराची चौकशी करून कारवाई करण्याची तयारी निवडणूक अधिका-यांनी सुरू केली आहे.