रज्जू करशानासना या आसनास ‘पुलिंग द रोप’ असंसुद्धा म्हणतात. कारण आपण पुलिंग द रोपसारखे किंवा त्याप्रमाणे करतो म्हणून याला पुलिंग द रोप असं म्हणतात.
योगा मॅटवर पाय सोडून बसा. दोन्ही पाय सरळ आणि ताठ असावेत. त्याचबरोबर फीट टुगेदर असावेत म्हणजेच एकमेकांना चिकटवलेले असावेत. पाठीचा कणा सरळ आणि ताठ असावा.
आता कल्पना करा की तुमच्या समोर रोप आहे आणि त्याला पकडलं आहे. उजवा हात वरच्या दिशेने घेऊन जावा. जेवढया वरती नेता येईल तितक्या वरती न्यावा. डावा हात हा खालीच असावा, दोन्ही हात ताठ आणि सरळ असावेत.
कोप-यातून हात दुमडता कामा नये. आता उजवा हात खाली आणावा आणि डावा हात वरच्या दिशेने न्यावा. जेवढा ताण देता येईल तेवढा ताण द्यावा. काही सेकंद थांबावं. नंतर हात खाली आणावा. आता ही झाली एक फेरी. हातांची हालचाल एकसाथ करू नये.
वेळ
या आसनाच्या दहा फे-या कराव्यात.
श्वास
» श्वास घेत हाताला वरती न्यावे.
» श्वास सोडताना हाताला खाली आणावे.
आसन करताना घ्यायची काळजी
या आसनात हात, पाय आणि पाठ ही सरळ आणि ताठ असावी. आपण उजवा हात वरती नेतो तेव्हा डावा हात हा डाव्या पायाच्या गुडघ्याजवळ ठेवावा. (चित्रात दाखवल्याप्रमाणे) आपण उजवा हात वरती नेतो तेव्हा डावा हात खाली असावा.
उजवा हात खाली नेतो तेव्हा डावा हात वरती न्यावा. हातांची हालचाल ही हळू असावी. हे आसन जलद करू नये. आसनादरम्यान पायांची स्थिती ही सरळ आणि ताठ असावी.
त्याचबरोबर हातांची स्थितीसुद्धा ताठ असावी. पाठीचा कणा ताठ आणि सरळ असावा. मानसुद्धा सरळ असावी. या आसनात हातांची हालचाल हळुवार असावी.
फायदे
» हे आसन खांद्याचे सांधे आणि पाठीच्या वरच्या भागासाठी खूप फायदेशीर आहे.
» खांदे आणि पाठीला चांगला ताण मिळतो.
» छातीचे स्नायू मजबूत होतात.
» या आसनाने पाठीचे दुखणे कमी होण्यास मदत होते.