मोबाईल विश्वात आघाडीवर असलेल्या सॅमसंग कंपनीने ‘सॅमसंग झेड २’ हा आणखी एक स्मार्टफोन भारतीय बाजारात लॉन्च केला.
नवी दिल्ली- मोबाईल विश्वात आघाडीवर असलेल्या सॅमसंग कंपनीने आणखी एक स्मार्टफोन भारतीय बाजारात लॉन्च केला. ‘सॅमसंग झेड २’ या नव्या स्मार्टफोनची किंमत अवघी चार हजार ५९० रुपये आहे. हा स्मार्टफोन गोल्ड, काळा आणि वाईन लाल रंगामध्ये उपलब्ध करण्यात आला आहे.
‘सॅमसंग झेड २’ हा स्मार्टफोन येत्या २९ ऑगस्टपासून ऑनलाईन शॉपिंग साईट पेटीएमवर आणि सॅमसंगच्या सर्व रिटेल दुकानांमध्ये उपलब्ध होणार आहे. टायझन ओएसवर चालणार सॅमसंगचा हा पहिला ४ जी स्मार्टफोन आहे. या स्मार्टफोनमध्ये १२ भारतीय भाषांचा समावेष करण्यात आलेला आहे.
‘सॅमसंग झेड २’ स्मार्टफोनचे फिचर्स
» चार इंच डिस्प्ले
» १.५ गिगाहर्टझ कॉडाकोर प्रोसेसर
» एक जीबी रॅम
» आठ जीबी इंटरनल मेमरी
» ४८०X८८० पिक्सल स्क्रिन रेझ्योल्यूशन
» पाच मेगापिक्सेल रेअर कॅमेरा
» ०.३ मेगापिक्सेल फ्रंट कॅमेरा
» १५०० एमएएच बॅटरी
किंमत – चार हजार ५९० रुपये