कराड- सातारा जिल्ह्यातील कराड तालुक्यातील वाठार गावच्या हद्दीत दोन बिबट्यांनी धूमाकूळ घातल्याने गावकरी भयभीत झाले आहेत.
पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावरील कराड जवळील वाठार या गावात बिबट्या दिवसाढवळ्या फिरताना दिसत आहेत. वन विभाग या बिबट्यांना पकडण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र यामध्ये अद्याप त्यांना यश आले नाही. यामुळे परिसरातील गावकरी भयभीत झाले आहेत.
गेल्या काही वर्षांपूर्वी एक बिबट्या कराड शहरात घुसला होता. पोलीस अधिकारी धस यांनी मोठे प्रसंगावधान राखून त्या बिबट्यावर गोळी झाडून त्याला ठार करुन अनेक लोकांचे प्राण वाचवले होते.