गिरगावातील भटवाडी येथील पाठारे इमारतीचा काही भाग कोसळून त्यामध्ये तीनजण अडकले होते.
मुंबई- गिरगावातील भटवाडी येथील पाठारे इमारतीचा काही भाग कोसळून त्यामध्ये तीनजण अडकले होते. बचावपथकाच्या अधिका-यांनी तीनही रहिवाशांना सुखरूप बाहेर काढले असून सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही. ही घटना शनिवारी सकाळी अचानक घडली.
गिरगावमधील जगन्नाथ शंकरशेठ मार्गावरील आर्यन शाळेजवळील गल्लीतील पाठारे हाऊल पाठारे हाऊस इमारतीच्या तिस-या मजल्याचा काही भाग अचानक कोसळला व त्यामध्ये तीन रहिवासी अडकले. या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या चार गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या.
बचावपथकाच्या अधिका-यांनी शर्थीचे प्रयत्न करून अडकलेल्या तिघांनाही सुखरुपरित्या बाहेर काढले. रात्रभर सुरू असलेल्या पावसामुळे इमारतीचा भाग कोसळल्याचा अंदाज व्यक्त होत आहे.