घोटाळा केल्याचा आरोप असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रमेश कदम यांना अखेर सोमवारी अटक करण्यात आली.
मुंबई – लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळात कोटयावधी रुपयांचा घोटाळा केल्याचा आरोप असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रमेश कदम यांना अखेर सोमवारी अटक करण्यात आली.
मागच्या अनेक दिवसांपासून फरार असलेल्या रमेश कदम यांना पहाटे पुणे-नगर रस्त्यावरील ग्रॅड ह्यात या पंचतारांकित हॉटेलमधून अटक करण्यात आली. मागच्या अनेक दिवसांपासून कदम पोलिसांना चकवा देत होते. त्यांना पकडण्यासाठी पोलिसांनी अनेक ठिकाणी धाडी देखील घातल्या होत्या.
अखेर सोमवारी पहाटे त्यांना अटक करण्यात सीआयडीला यश मिळाले. कदम यांना अटक करुन सीआयडी पथक त्यांना घेऊन नवी मुंबईच्या दिशेने रवाना झाले आहे. अण्णाभाऊ साठे विकास महामंडळाच्या अध्यक्षपदावर असताना नियमांना डावलून कोटयावधी रुपयांचा घोटाळा केल्याचा आरोप रमेश कदम यांच्यावर आहे.