अजानवेळी वापरण्यात येणा-या लाऊडस्पीकरवरून गायक सोनू निगम चांगलाच चर्चेत आला होता. मशिदीमध्ये होणा-या अजानविरोधात ट्विट केल्यानंतर सोनू निगमविरोधात हरियाणातील न्यायालयात तक्रार दाखल करण्यात आली होती.
अमृतसर – अजानवेळी वापरण्यात येणा-या लाऊडस्पीकरवरून गायक सोनू निगम चांगलाच चर्चेत आला होता. मशिदीमध्ये होणा-या अजानविरोधात ट्विट केल्यानंतर सोनू निगमविरोधात हरियाणातील न्यायालयात तक्रार दाखल करण्यात आली होती. पण या प्रकरणात सोनूला उच्च न्यायालयाने दिलासा देत क्लीनचिट दिली. जेव्हा इस्लाम धर्माची स्थापना झाली तेव्हा वीज आणि मायक्रोफोन असे काहीही नव्हते. त्यामुळेच मुस्लीम धर्मचा लाऊडस्पीकर हा काही अविभाज्य घटक नाही, असे न्यायालयाने सांगत सोनूला दिलासा दिला.
पंजाब-हरियाणा उच्च न्यायालयाने सोनूच्या बाजूने कौल देत, सोनूने अजानविरोधात कोणतेही ट्विट केले नसून ते लाऊडस्पीकरविरोधात होते असे स्पष्ट केले. याआधी सोमवारी न्यायाधीश एमएमएस बेदी यांनी सोनू निगमविरोधात दाखल केलेली याचिका फेटाळली होती. या प्रकरणाबाबत लागू केलेल्या आदेशांमध्ये न्यायालयाने सांगितले की, सोनूने जे ट्विट केले होते. त्यावरून त्याला बळीचा बकरा बनवला जाण्याचा प्रयत्न करण्यात येतोय असं स्पष्ट दिसतं. अशा प्रकारच्या प्रयत्नांना वेळीच आळा घालण्याची गरज आहे. संविधानानुसार एकता, बंधुभाव यांचे संरक्षण करणं फार जरूरी आहे.
अजान हा मुस्लीम धमार्चा अविभाज्य घटक आहे. सकाळच्या प्रार्थनेमध्ये सगळ्यांना आमंत्रित करण्याचे लाऊडस्पीकर हे एक माध्यम आहे. पण म्हणून लाऊडस्पीकर हा मुस्लीम धमार्चा महत्त्वपूर्ण घटक होत नाही, असे मत उच्च न्यायालयाने मांडले. सर्वोच्च न्यायालय तसेच इतर न्यायालयाने यावेळी लाऊडस्पीकरवर देण्यात आलेला निर्णय हा पूर्णपणे लाऊडस्पीकरशी निगडीत असल्याचे स्पष्ट केले.
उच्च न्यायलयाने हेही स्पष्ट केले की, या निर्णयात जे शब्द वापरण्यात आले ते अजानसंदर्भात नसून लाऊडस्पीकरसंदर्भात होते. या शब्दांवरून कोणत्याही धर्माच्या भावना दुखावल्या जाणार नाहीत. काही दिवसांपूर्वी हरियाणास्थित आस मोहम्मद यांनी सोनू निगम विरोधात उच्च न्यायालयात तक्रार दाखल केली होती. सोशल मीडियावर अजानविरोधात वक्तव्य केल्याबद्दल त्याच्याविरोधात ही तक्रार करण्यात आली होती.