मुंबई- राज्यात विविध राजकीय नेते आणि सामाजिक संघटनांच्यावतीने रक्षाबंधन सण विविध उपक्रमांद्वारे साजरा करण्यात येत आहे.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे यांना त्यांच्या भगिनी जयवंती ठाकरे यांनी राखी बांधुन रक्षाबंधनाचा सण साजरा केला. तर अमित ठाकरे यांना उर्वशी ठाकरे यांनी राखी बांधली.
त्याआधी शनिवारी कमला मेहता अंध शाळेतील विद्यार्थिनींसोबत रक्षाबंधनाचा कार्यक्रम अमित ठाकरे यांनी साजरा केला.