सिंगापूर येथील क्वीन्सटाउन कँपसमधील ग्लोबल इंडियन इंटरनॅशनल स्कूलच्या (जीआयआयएस) अनुष्का गायकवाडने संपूर्ण एएसइएएन प्रदेशात २०१६ सालच्या सीबीएसईच्या १२वीच्या परीक्षेत ५०० पैकी ४९१ गुण म्हणजेच ९८.२ टक्के मिळवत अव्वल स्थान पटकावले आहे. शुभम सराफने ५०० पैकी ४९० गुण म्हणजेच ९८ टक्के मिळवत द्वितीय स्थान पटकावले आहे.
नागपुरात जन्म झालेल्या अनुष्का पुण्यात वाढली. २०१० मध्ये अनुष्काचे कुटुंब सिंगापूर येथे गेले आणि जीआयआयएसमध्ये ती सातवीच्या वर्गात दाखल झाली. तिचे कपाट विविध क्रीडा आणि शैक्षणिक पुरस्कारांनी भरून गेले आहे, अनुष्का नेहमीच सर्व क्षेत्रांमध्ये उज्ज्वल विद्यार्थिनी राहिली आहे. ती शाळेतल्या अनेक टेनिस मॅच खेळली आहे आणि तिला संगीताची फार आवड आहे. अनुष्काला पुढे इंजिनीअिरगचा अभ्यास करायचाय.
शुभम २००८ साली पुण्याहून सिंगापूरला त्याच्या कुटुंबासह स्थायिक झाला. आणि तेव्हापासून तो जीआयआयएसचा विद्यार्थी आहे. शाळेबरोबरच्या या आठ वर्षाच्या प्रवासात अनेक शैक्षणिक आणि क्रीडाविषयक पुरस्कार त्याने मिळवले आहेत. १२ आणि १४ वर्षाखालील सिंगापूर क्रिकेट टीममध्ये तो खेळला होता आणि याशिवाय तो एक उत्तम टेनिसपटू आहे. शुभमला शाळेनंतर केमिकल इंजिनीअिरग करायचे आहे.
जीआयआयएसच्या विद्यार्थ्यांनी अनेक विषयांत परिपूर्ण (१०० गुण) किंवा अगदी परिपूर्णतेच्या जवळपास (९९ गुण) मिळवले आहेत. शुभम सराफला केमिस्ट्रीमध्ये १०० गुण आणि अनुष्का गायकवाडला फिजिक्समध्ये १०० मार्क मिळाले आहेत. रामिह अरूणाचलमला इकनॉमिक्समध्ये ९९ गुण प्राप्त झाले आहेत, शुभमने कम्प्युटर सायन्समध्ये सर्वोत्तम म्हणजे ९९ गुण मिळवले आहेत, तर अनुष्का आणि शुभम दोघांनाही गणितात ९९ गुण मिळाले आहेत.
सिंगापूरमधील जीआयआयमधील २०१६ सालच्या सीबीएसईच्या परीक्षेत सर्वोत्तम शैक्षणिक कामगिरी करणा-या विद्यार्थ्यांनी आणखी एक रेकॉर्ड प्रस्थापित केला आहे. संपूर्ण बॅचपैकी २५ टक्के विद्यार्थ्यांना ९५ टक्केआणि त्यापेक्षा जास्त आणि जवळपास ५० टक्के विद्यार्थ्यांना ९० आणि त्यापेक्षा जास्त गुण प्राप्त झाले आहेत.
सीओओ आणि प्रादेशिक संचालक कमल गुप्ता म्हणाले की, ‘आम्हाला आमच्या विद्यार्थ्यांचा अभिमान वाटतो. त्यांचा निश्चय आणि शिक्षकांचे मार्गदर्शन यांमुळे जीआयआयएसमध्ये सर्वोत्तम यश मिळवणे शक्य झाले.’ ते पुढे म्हणाले, ‘अशा प्रकारे उत्तम विकास साधल्याबद्दल आम्हाला अभिमान वाटतो, आम्ही आमच्या विद्यार्थ्यांना सक्षम अध्ययक बनवतो आणि नऊ जेम्स मॉडेलच्या साहाय्याने एक चांगलं नेतृत्वही त्यांच्या अंगी बाणवतो. आमचे प्राध्यापक आणि पालक यांच्या संलग्नतेअंतर्गत झालेल्या उपक्रमांमुळे हे यश मिळाल्याचा मला विश्वास आहे. सर्व टीमच्या सदस्यांना, विद्यार्थ्यांना आणि पालकांना या भरीव यशाबद्दल माझ्याकडून मन:पूर्वक शुभेच्छा.’’