पूर्व अफगणिस्तानमध्ये मोटार सायकलवरून आलेल्या एका व्यक्तीने आत्मघाती स्फोट घडवून आणला. या स्फोटात सहा ठार तर २२ जण जखमी झाले आहेत.
काबूल- पूर्व अफगणिस्तानमध्ये मोटार सायकलवरून आलेल्या एका व्यक्तीने आत्मघाती स्फोट घडवून आणला. या स्फोटात सहा ठार तर २२ जण जखमी झाले आहेत. हा स्फोट मंगळवारी दुपारच्या सुमारास झाला.
काबूलमधील परवान येथे गजबजलेल्या भागात हा आत्मघाती स्फोट झाला. पोलिसांना लक्ष करून आत्मघाती स्फोट घडविणार होते. मात्र या दहशतवाद्याने शाळा आणि दवाखाना असलेल्या परिसरात हा हल्ला घडवून आणला, अशी माहिती पोलीस अधीक्षक परवान मोहम्मद झमन ममोझई यांनी दिली.
या स्फोटात सहाजणांचा मृत्यू झाला आहे तर २२ जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
अद्याप कोणत्याही दहशतवादी संघटनेने हल्ल्याची जबाबदारी स्वीकारलेली नाही.