बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार आता शोले चित्रपटातील गब्बरचा नवा अवतार घेऊन लोकांना भ्रष्टाचाराविरोधात मदत करण्यासाठी येत आहे.
मुंबई- खिलाडियों का खिलाडी अक्षय कुमार आता शोले चित्रपटातील गब्बरचा नवा अवतार घेऊन येत आहे. यात गब्बर लोकांना घाबरवणार किंवा धमकवणार नाही तर, लोकांना भ्रष्टाचाराविरोधात मदत करणार आहे.
अक्षय कुमारने ‘गब्बर इज बॅक’, ‘अब करप्शन की उल्टी गिनती शुरू’ असे ट्विट करत ट्विटरवर चित्रपटाचे नविन पोस्टर ‘आरआयपी करप्शन’ प्रसिद्ध केले आहे.
अर्थात ‘गब्बर इज बॅक’ हा चित्रपट एक मे रोजी प्रदर्शित होत आहे. आणि त्या दिवसापासून भ्रष्टाचाराचा नायनाट करणार, असा संदेश या पोस्टरद्वारे देण्यात आला आहे.
यात भ्रष्टाचाराचा जन्म १५ ऑगस्ट १९४७ रोजी झाल्याचे म्हटले आहे.
Ab corruption ki ulti ginti shuru! Share karo #WarnaGabbarAaJayega pic.twitter.com/SdNaSc4HFL
— Akshay Kumar (@akshaykumar) March 18, 2015
नुकतेच प्रदर्शित करण्यात आलेल्या चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये टीजर पोस्टर सोबत अक्षयचे गब्बर स्टाइल डायलॉग जारी करण्यात आले आहेत. ‘यहाँ से ५०-५० कोस दूर जब कोई बच्चा रोता है’ ला आपल्याच अंदाजात बोलत ‘५०-५० कोस दूर जब कोई रिश्वत लेता है, तो सब कहते है मत ले वरना गब्बर आ जाएगा’ असे अनेक गब्बर स्टाइल डायलॉग यात आहेत. या गब्बरचे भांडण भ्रष्टाचाराशी आहे.
तमिळ चित्रपट ‘रामन्ना’चा हा रिमेक आहे. राधाकृष्ण जागर्लामुडी दिग्दर्शित या चित्रपटात अक्षयकुमार प्रमुख भूमिकेत असून प्रकाश राज आणि सोनू सूद हे मुख्य भूमिकेत आहेत. तर तमिळ आणि तेलुगू चित्रपटातून भूमिका केलेली अभिनेत्री आणि अभिनेता कमल हासन यांची मुलगी श्रुती हासन, करीना कपूर, चित्रगंधा सिंग आणि निकितिन धीर यांनीही विशेष भूमिका साकारल्या आहेत.
Ab galti se bhi rishwat mat lena aur naa hi dena…#WarnaGabbarAaJayega! Watch the first teaser here – http://t.co/zKPk5Pmit6
— Akshay Kumar (@akshaykumar) March 13, 2015
#KhiladiIsBack Release Date Main GabbarTrailer On March 23rd! Are you EXCITED??? @akshaykumar #WarnaGabbarAaJayega pic.twitter.com/LCSsmmhlkV
— Akshay Kumar FB (@akshaykumarfb) March 18, 2015