राज्यातील ‘आदर्श शिक्षक’ पुरस्कारप्राप्त शिक्षकांना दोनदा वेतनवाढ देण्याचा व त्याचा दर निश्चित करण्याचा निर्णय लवकरच घेण्यात येईल, अशी ग्वाही शालेय शिक्षणमंत्री राजेंद्र दर्डा यांनी सोमवारी विधान परिषदेत दिली.
मुंबई- राज्यातील ‘आदर्श शिक्षक’ पुरस्कारप्राप्त शिक्षकांना दोनदा वेतनवाढ देण्याचा व त्याचा दर निश्चित करण्याचा निर्णय लवकरच घेण्यात येईल, अशी ग्वाही शालेय शिक्षणमंत्री राजेंद्र दर्डा यांनी सोमवारी विधान परिषदेत दिली. या शिक्षकांना आगाऊ वेतनवाढ देण्यासाठी तयार करण्यात आलेल्या प्रस्तावास मंत्रिमंडळाची मान्यता घेण्याची कार्यवाही सुरू असून याबद्दल निर्णय झाल्यास राज्यातील सर्व ‘आदर्श शिक्षक’ पुरस्कार प्राप्त शिक्षकांना जादा वेतनवाढ दिली, जाईल यासंबंधी शालेय शिक्षण विभागाची भूमिका सकारात्मक असल्याचेही दर्डा यांनी सांगितले.
आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त शिक्षकांना दोन जादा वेतनवाढ देण्याचा सरकारचा धोरणात्मक निर्णय असताना २००९-१० मधील पुरस्कारप्राप्त शिक्षकांना अद्याप जादा वेतनवाढ देण्यात आली नसल्याची बाब विधान परिषद सदस्य डॉ. सुधीर तांबे, रामनाथ मोते, विक्रम काळे आदींनी उपस्थित केली होती.