देशभरात महिलांवरील अत्याचाराचे सत्र सुरुच असून सोमवारी दिवसभरात अल्पवयीन बलात्काराच्या चार घटनांची नोंद झाली.
भावानेच केला बलात्कार
नवी दिल्ली – अल्पवयीन मुलीवर बसमध्ये बलात्कार केल्याच्या घटनेत तिच्या भावाला दिल्ली पोलिसांनी अटक केली आहे. या मुलीवर तिच्याच भावाने सहा महिन्यांपूर्वी बलात्कार करुन तिची छळवणूक केल्याचे पुरावे पोलिसांच्या हाती लागले आहेत.
आता तरी… जागे व्हा!
या सोळा वर्षीय मुलीने आपली करुण कहाणी रविवारी पोलिसांसमोर मांडली. त्यानुसार तिचा भाऊ नजाकत अलीला (१९) अटक केली आहे. शनिवारी रात्री ह्या मुलीने घरच्यांच्या त्रासाला कंटाळून पळ काढला. मात्र तिच्यावर बसवाहकानेही अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला. दक्षिण दिल्लीत घडलेल्या या प्रकरणानंतर बसवाहक रणजित सिंग याला दिल्ली पोलिसांनी शनिवारी अटक केली आहे.
दिल्ली पोलिस उपायुक्तांच्या म्हणण्यानुसार, तिच्या वडिलांनी तीन वेळा विवाह केला होता. त्यांच्या घरात वरचेवर भांडणं होत असत. तिच्या भावाने तिच्यावर सहा महिन्यांपूर्वी बलात्कार केला. आणि त्यानंतर तो तिला त्रास देत होता अशी माहिती या मुलीने दिली.
घरच्यांच्या त्रासाला कंटाळलेल्या या मुलीने शनिवारी रात्री साडेनऊ वाजता घर सोडले. रात्री अकराच्या सुमारास मंडी हाऊसजवळ ही बस आली त्यावेळी एक मुलगी रडत असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. चौकशीअंती पोलिसांना सगळा प्रकार उघडकीस आला.
दरम्यान, तिच्या कुटुंबियांनी खय्या पोलिस स्थानकात आपली मुलगी हरवल्याची तक्रार दाखल केली होती. त्यानुसार पोलिसांची सगळी सुत्र फिरल्यानंतर संपूर्ण घटना उघडकीस आली.
मानसिक शोषण करणा-या युवकाला अटक
सालेम – अल्पवयीन मुलींना अश्लिल चित्रे दाखवून मानसिक शोषण करणा-या १९ वर्षीय मुलाला पोलिसांनी अटक केली आहे.भारतीय दंडविधान ५०९ च्या कायद्याअंतर्गत या मुलाला अटक करण्यात आली आहे. त्याशिवाय त्याला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.
तेरा वर्षीय मुलीवर बलात्कार
हसन – कर्नाटकातील हसन जिल्ह्यात एका १३ वर्षीय शालेय मुलीवर तिच्याच शेजारच्यांनी बलात्कार केल्याची घटना घडली आहे. आठवीत शिकणा-या या मुलीच्या आईने त्यांच्या शेजारी राहणा-या रंगराजू काकांना’ शाळेत सोडण्याची विनंती केली. या काकांनी वाटेत तिच्यावर बलात्कार केला आणि घडलेला प्रकार घरी न सांगण्याची धमकी दिली. रविवारी रात्री रंगराजूवर गुन्हा दाखल करण्यात आला असून तो फरार आहे.
ठाण्यातही सामुहिक बलात्कार
ठाणे – एका तरुणीवर नऊ महिन्यांपूर्वी तीन जणांनी सामुहिक बलात्कार केल्याची घटना ठाण्यात घडली आहे. शनिवारी रात्री या तरुणीने केईएम रुग्णालयात एका मुलाला जन्म दिला. केईएम रुग्णालयात दाखल होताना होणा-या मुलाच्या पित्याचे नाव सांगायला नकार दिला. पोलिसांनी अधिक चौकशी केल्यानंतर बलात्काराची ही घटना समोर आली. केईएममधील डॉक्टरांच्या सांगण्यावरुन तरुणींने ठाण्याच्या भोईवाडा पोलिस स्थानकात तक्रार दाखल केली आहे.
नऊ महिन्यांपूर्वी गाडीतून जात असताना तीन जणांनी तिच्यावर सामुहिक बलात्कार केल्याचे पोलिसांना तिने सांगितले.
[EPSB]
आता तरी… जागे व्हा!
कायदे बदलून महिलांवरील अत्याचाराला आळा बसेल का? डोळ्यादेखत घडणा-या अशा प्रकारांविरोधात आवाज उठवण्यास समाजही कमी पडतो आहे का? स्त्रियांच्या सुरक्षिततेसाठी समाजाची मानसिकता बदलायला हवी का? समाजाचा स्त्रीकडे पाहण्याचा दृष्टिकोन कसा बदलेल? यावर आपली मते द्या….
[/EPSB]