भारताने ओमानचा ६-१ असा दणदणीत पराभव करुन तिस-या आशिया चँपियन्स हॉकी स्पर्धेत पाचवे स्थान पटकावले.
काकामिगॅहारा (जपान)- भारताच्या आकाशदीप सिंग याने केलेल्या तीन गोलमुळे रविवारी भारताने ओमानचा ६-१ असा दणदणीत पराभव करुन तिस-या आशिया चँपियन्स हॉकी स्पर्धेत पाचवे स्थान पटकावले. दोन्ही सत्रात भारताने प्रत्येकी तीन गोल केले.
कोठाजीत सिंग याने सहाव्या मिनिटाला पॅनल्टी कॉर्नरवर गोल केला. त्यानंतर पाच मिनिटांच्या अंतराने गुरजिंदर सिंगने पॅनल्टी कॉर्नरवरच दोन गोल नोंदविले. सामन्याच्या २४व्या मिनिटाला आकाशदीप सिंगने मनदीपच्या पासवर गोल करत पूर्वार्धातच भारताला ४-० अशी आघाडी मिळवून दिली.
त्यानंतर दुस-या सत्रात आकाशदीपनेच आणखी दोन गोल करुन भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. ओमानकडून पॅनल्टी कॉर्नरवर अवघा एक गोल मोहम्मद हुबैस अल शार याने केला.