इजिप्तचे माजी राष्ट्राध्यक्ष मोहम्मद मोर्सी यांचे समर्थन करणा-या ५०० हून अधिक जणांना पोलिसांची हत्या तसेच इतर हिंसक घटनांप्रकरणी दोषी ठरवत न्यायालयाने त्यांना फाशीची शिक्षा सुनावली आहे.
कैरो – इजिप्तचे माजी राष्ट्राध्यक्ष मोहम्मद मोर्सी यांचे समर्थन करणा-या ५०० हून अधिक जणांना पोलिसांची हत्या तसेच इतर हिंसक घटनांप्रकरणी दोषी ठरवत न्यायालयाने त्यांना फाशीची शिक्षा सुनावली आहे.
इजिप्तमधील मिन्या येथील न्यायालयाने हा निर्णय दिला. मोर्सी यांच्या एकूण ५२९ समर्थकांना फाशीची शिक्षा ठोठावण्यात आली आहे.
या सुनावणीदरम्या न्यायालयाने २६ जणांची सुटका केली आहे. शिक्षा सुनावण्यात आलेल्या सगळ्यांनाच पोलिसांनी गेल्या वर्षी ऑगस्ट २०१३ मध्ये अटक केली होती. मोर्सी यांची पुनर्नियुक्ती करण्यात यावी या मागणीसाठी समर्थकांनी दक्षिण इजिप्तमध्ये हिंसक आंदोलन सुरू केले होते. पोलिसांनी बळाचा वापर करुन हे आंदोलन मोडून काढत सगळ्यांना अटक केली होती.यावेळी पोलिसांनी १२०० मोर्सी समर्थकांविरुद्ध विविध आरोप ठेवून खटले दाखल करण्यात आले होते.