नवी दिल्ली – इटलीतील जन्वा शहरात पूल कोसळून मोठा अपघात झाला आहे. या भीषण अपघातामध्ये अनेक लोक मारले गेले असावेत, असे वृत्त समोर आले आहे. इटलीचे वाहतूक मंत्री डॅनिलो टोनिनेली यांनी ही मोठी दुर्घटना असल्याचे म्हटले आहे.
इथल्या अॅडनक्रोनोस या वृत्तसंस्थेने स्थानिक अँब्युलन्स सेवेच्या हवाल्याने मृतांची संख्या मोठी असल्याचं म्हटले आहे. या दुर्घटनेत पुलाचा मोठा भाग कोसळला असून कोसळेला भाग हा रेल्वेमार्गावर पडला.
याबरोबर पुलावर वाहतूक करणारे ट्रक आणि इतर वाहनेही खाली कोसळली आहेत. हा पूल १९६०मध्ये बांधण्यात आला असून पुलाचे नाव मोरांडी पूल असे आहे. पुलाचा कोसळलेला भाग फार मोठा आहे. या परिसरात मोठा पाऊस सुरू असताना हा पूल कोसळला आहे.