उत्तराखंडच्या मदतीसाठी काँग्रेसच्या सर्व आमदार – खासदारांनी एक महिन्याचे वेतन देण्याचे आदेश सोनिया गांधी यांनी दिले आहेत.
नवी दिल्ली – उत्तराखंडच्या मदतीसाठी काँग्रेसच्या सर्व आमदार आणि खासदारांनी आपला एक महिन्याचे वेतन द्यावे असे आदेश काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी दिले आहेत.
तसेच लोकसभा आणि राज्यसभेतील काँग्रेसच्या प्रत्येक खासदाराने खासदार फंडातून १० लाख रुपये मदतनिधी म्हणून देण्याचे आदेश सोनिया गांधींनी दिल्याचे केंद्रीय मंत्री अजय माकन यांनी पत्रकारांना सांगितले. काँग्रेसचे लोकसभेत २०३ तर राज्यसभेत ७२ खासदार आहेत. सरकारने लोकांच्या मदतीसाठी देहरादून येथे मदतकेंद्र उभारले आहे. एआयसीसीचे सचिव संजय कपूर आणि महेंद्र जोशी यांना मदतकेंद्राचे कार्य पाहण्यासाठी पाठवण्यात आले आहे.
उत्तराखंडमधील विशेषत: केदारनाथ येथे झालेले नुकसान भरुन येण्यासाठी किमान पाच वर्षांचा अवधी लागेल, असे उत्तराखंडचे कृषीमंत्री हरक सिंग रावत यांनी सांगितले. हरक सिंग रावत यांनी केदारनाथ आणि आजूबाजूच्या परिसराचा दौरा केला.
दरम्यान, ४० हेलिकॉप्टरच्या मदतीने केदारनाथ आणि बद्रीनाथ भागात अडकलेल्या ९००० यात्रेकरुंना सुखरुपणे बाहेर काढण्यात आले आहे.
[EPSB]
हरिद्वारमध्ये सापडले ४० मृतदेह »
हरिद्वारमध्ये गंगा नदीच्या काठावर ४० मृतदेह सापडले असून मृतांचा आकडा १९० वर पोहचला आहे.
[/EPSB]