मुंबई – एमजी मोटर इंडियाने समाजात सकारात्मक बदल घडवून आणणा-या भारतातील ६ कर्तृत्ववान महिलांच्या कार्याला अधोरेखित करण्याच्या उद्देशाने द बेटर इंडियाच्या सहयोगाने ‘एमजीचेंज मेकर्स हा उपक्रम सुरू केला आहे. या उपक्रमाचा मुख्य उद्देश या महिलांनी केलेल्या अतुलनीय कार्याची ओळख समाजाला करून देताना समाजातील अधिकाधिक महिलांना प्रेरित करण्यासह सकारात्मक बदल घडवण्यासाठी उद्युक्त करणे हा आहे.
या सहा कर्तृत्ववान महिलांमध्ये पद्मश्री सुधा वर्गीस, महिला ग्रामीण बँकिंगची प्रवर्तक चेतना सिन्हा, भारताची सर्वात लहान सरपंच जबना चौधरी, डॉ. राणी बंग, प्रसिद्ध ट्रान्सजेंडर कार्यकर्ता कल्की सुब्रमण्यम आणि नॉर्थ ईस्ट नेटवर्कची संस्थापक मोनिषा बेहल यांचा समावेश आहे.
याप्रसंगी बोलताना नंदिता दास म्हणाल्या, आपापल्या समुदायात प्रभावी कार्य करणा-या महिलांच्या कार्यास अधोरेखित करणा-या या एमजीचेंज मेकर्स मोहिमेचे सगळ्यांनी समर्थन केले पाहिजे. यावेळी निष्ठा सत्यम, पल्लवी सिंह, द बेटर इंडियाच्या उपसंपादक तानया सिंह आदी मान्यवर उपस्थित होते.