ठाणे महापालिका क्षेत्रातील व्यापा-यांना आता दोन टप्प्यांत एलबीटी फरकाची रक्कम भरण्याची मुभा देण्यात आली आहे.
ठाणे – ठाणे महापालिका क्षेत्रातील व्यापा-यांना आता दोन टप्प्यांत एलबीटी फरकाची रक्कम भरण्याची मुभा देण्यात आली आहे. पूर्वी ठाणे महापालिका आयुक्त असीमकुमार गुप्ता यांनी एलबीटी फरकाची रक्कम २० डिसेंबपर्यंत भरण्याचे आवाहन व्यापा-यांना केले होते.
ठाणे महापालिका क्षेत्रातील ३० टक्के व्यापारी नियमितपणे २ टक्के दराने एलबीटी भरत आहेत व तब्बल ७० टक्के व्यापारी हा कर भरत नसल्याने आयुक्तांनी पालिके च्या शेल्डयुलप्रमाणे फरकाची रक्कम एप्रिल २०१३ पासून भरण्याचे आदेश दिले होते.
या प्रकरणी ठाणे व्यापार उद्योग महासंघ (ठाम)चे अध्यक्ष मधुसूदन खांबेटे, उपाध्यक्ष आशिष शिरसाट यांनी नुकतीच आयुक्त गुप्ता यांची भेट घेतली. या भेटीदरम्यान फरकाची रक्कम दोन टप्प्यांमध्ये बीनव्याजी भरण्याची विनंती केली आहे.
त्यानुसार आयुक्तांनी ही विनंती मान्य केली आहे. त्यामुळे ५० टक्के फरकाची रक्कम २० डिसेंबरच्या आत व उरलेली ५० टक्के फरकाची रक्कम २० जानेवारी २०१४पर्यंत बीनव्याजी घेण्याचे मान्य केले आहे,अशी माहिती ठामचे उपाध्यक्ष शिरसाट यांनी पत्रकार परिषदेत दिली. ठाणे शहरात तब्बल आमच्या संघटनेचे २८ हजार सदस्य आहेत.
त्यातील ३५ टक्के व्यापा-यांनी या कराचा भरणा करायला सुरुवात केली आहे. पण ठाणे शहरात अनेक लहान उद्योग आहेत. त्यांची नोंद महापालिकेकडे नाही. त्यामुळे त्यांच्याक डून हा कर वसूल केला जात नाही. त्याचा नाहक फटको नियमित एलबीटी भरणा-या व्यापा-यांना बसतो, असेही शिरसाठ यांनी सांगितले.