मराठी चित्रपटांच्या इतिहासातील बॉक्स ऑफिसवरील सर्वाधिक यशस्वी चित्रपट म्हणून ‘दुनियादारी’ने नवा इतिहास नोंदवला आहे.
मुंबई– मराठी चित्रपटांच्या इतिहासातील बॉक्स ऑफिसवरील सर्वाधिक यशस्वी चित्रपट म्हणून ‘दुनियादारी’ने नवा इतिहास नोंदवला आहे. सुहास शिरवळकरांच्या कादंबरीवर आधारीत या चित्रपटाने ४५ दिवसांत २२ कोटींचा गल्ला जमवला आहे. विशेष म्हणजे इतक्या कमी कालावधीमध्ये अशा विक्रम करणारा हा पहिलाच मराठी चित्रपट आहे.
मराठी चित्रपटाच्या इतिहासात यापूर्वी ‘मी शिवाजीराजे भोसले बोलतो’य या चित्रपटाने साडे एकवीस कोटींचा पल्ला गाठला होता. मात्र ‘दुनियादारी’ने हा विक्रम मागे टाकत ऐंशी वर्षाच्या मराठी चित्रपट इतिहासातील सर्वांत यशस्वी चित्रपट ठरला आहे. सातव्या आठवड्यात या चित्रपटाचे १८० चित्रपटगृहातून दिवसाला ४०० शो सुरु आहेत.
राज्यातील मुंबई, पुणे, कोल्हापूहसह मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र आणि गुजरात, गोवा, कर्नाटक आणि मध्य प्रदेश या राज्यांमध्ये ‘दुनियादारी’ने गर्दी केली आहे.
मराठी चित्रपटांमधील सुपर हिट चित्रपट
>दुनियादारी- २२ कोटी
>मी शिवाजीराजे भोसले बोलतोय- साडे एकवीस कोटी
>दे धक्का- १५ कोटी
>बीपी- १२ कोटी
>नटरंग, काकस्पर्श- प्रत्येकी दहा कोटी
[EPSB]
‘दुनियादारी’ कादंबरीचाही तडाखेबंद खप
मराठी चित्रपट ‘दुनियादारी’ आला आणि ‘सुशि’ तथा सुहास शिरवळकर यांच्या अनेक वर्षापूर्वीच्या ‘दुनियादारी’ कादंबरीचीही शोधाशोध सुरू झाली.
कॉलेजच्या भावविश्वाची ‘दुनियादारी’
तरुणपणीचा काळ सुखाचा, असं वाक्य अनेक वेळा कानावर येत असतं. काय असतं या काळात? भल्याबु-याची समज जरी काहीशी कमी असली तरी असतो तो एक उत्साह, एक ऊर्मी, ऊर्जा.. ती मग बोलण्यात, वागण्यात येते, तशीच ती त्या वेळी केलेल्या अनेक गोष्टींमध्ये येते. सुहास शिरवळकरांनी ही ऊर्जा ‘दुनियादारी’ या कादंबरीत आणली, ती तशीच्या तशीच या कांदबरीवर बनलेल्या […]
[/EPSB]