भारत-ऑस्ट्रेलियादरम्यानच्या कसोटी मालिकेतील मेलबर्न येथे होणा-या तिस-या सामन्यासाठी दुखापतग्रस्त मिशेल मार्शच्या जागी ज्यो बर्न्सची निवड करण्यात आली आहे
ब्रिस्बेन – भारत-ऑस्ट्रेलियादरम्यानच्या कसोटी मालिकेतील मेलबर्न येथे होणा-या तिस-या सामन्यासाठी दुखापतग्रस्त मिशेल मार्शच्या जागी ज्यो बर्न्सची निवड करण्यात आली आहे. या सामन्यातून बर्न्स कसोटी मध्ये पदार्पण करणार आहे.
ऑस्ट्रेलियाच्या राष्ट्रीय निवड समितीने क्वीन्सलँडर ज्यो बर्न्सची संघात निवड केल्याची ऑस्ट्रेलिया क्रिकेटने माहिती दिली. २५ वर्षीय बर्न्स मार्शच्याजागी खेळणार आहे.
चार सामन्यांच्या मालिकेत ऑस्ट्रेलिया २-० ने आघाडीवर आहे. २६ डिसेंबरपासून मेलबर्न येथे तिसरी कसोटी सुरु होणार आहे.
‘कसोटी संघात माझी निवड झाली ही बातमी ऐकून मी अतिशय आनंदित आहे. ख्रिसमसमधील मला मिळालेले ही सर्वोत्तम भेट आहे. मी खूप आनंदी आहे’ अशी प्रतिक्रिया बर्न्सने यावेळी दिली.
ऑस्ट्रेलिया संघ – स्टीव्हन स्मिथ(कर्णधार), डेविड वॉर्नर, ख्रिस रॉजर्स, शेन वॉटसन, शॉन मार्श, ज्यो बर्न्स,ब्रॅड हॅडिन, मिशेल जॉन्सन, मिशेल स्टार्क, नॅथन लॉयन, जोश हेझलवूड, रयान हॅरिस आणि रीटर सिडेल