इंजिनीअरिंग कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी स्वयंप्रेरणेने बनविलेला ‘सुपरहिरो ऑफ कणकवली’ या मोबाईल गेमचे लॉँजिंग ‘प्रहार’ भवन येथे युवा नेते नितेश राणे यांच्या उपस्थितीत करण्यात आले.
कणकवली- काँग्रेसचे युवा नेते नितेश राणे यांनी ‘सुपरहिरो’ म्हणून युवकांच्या मनामनात आपले स्थान निर्माण केले आहे. त्यांचे उत्कृष्ट उदाहरण म्हणून इंजिनीअरिंग कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी स्वयंप्रेरणेने बनविलेला ‘सुपरहिरो ऑफ कणकवली’ हा मोबाइल गेम होय. या गेमचे लॉँजिंग ‘प्रहार’ भवन येथे युवा नेते नितेश राणे यांच्या उपस्थितीत मंगळवारी करण्यात आले.
हा गेम गुगलच्या प्लेस्टोअरवरून मोफत डाउनलोड करता येणार आहे.
सिंधुदुर्ग जिल्हय़ाचा झालेला विकास आणि त्यात उद्योगमंत्री नारायण राणे व त्यांच्या कुटुंबीयांचे असलेले योगदान यावर आधारित हा गेम आहे. विकासात अडथळे आणि राजकीय विरोध प्रकर्षाने दिसतो. नितेश राणे यांनी विकासाची संकल्पना वडील नारायण राणे यांच्याकडून आत्मसात केली. तेव्हा त्यांच्या समोर उद्दिष्ट निश्चित होतं. सिंधुदुर्गाची भौगोलिक स्थिती रस्ते, पाणी, आरोग्याची सेवा, एस. टी. ची परिवहन सेवा या मुद्दय़ांना केंद्रबिंदू ठेऊन काम करताना शिक्षणाच्या सुविधा, उच्च शिक्षणाच्या गरजेकडे लक्ष दिले.
इंजिनिअरींग कॉलेज, उद्योगविद्या कॉलेज, मेडिकल कॉलेजची उभारणी करून येथील तरुणांना उच्चशिक्षणाची संधी दिली. या तरुणाला नोकरीचा प्रश्न भेडसावू लागल्यावर नितेश राणे यांनी रोजगार मेळाव्याद्वारे जिल्हय़ातील १५ हजार तरुणांना एकाच वेळी नोक-या दिल्या. हे काम सामान्य कुटुंबातील तरुणांच्या राहणीमानात बदल करणारे होते. ‘कणकवलीचा सुपरहिरो’ या गेममध्ये परिवर्तन होणारी स्थिती दाखविली आहे. त्यासाठी गेममध्ये विरोध करणारी शक्ती आणि त्याचा प्रतिकार करून विकास करणारा हिरो म्हणून नितेश राणे यांना दाखविले आहे.
बेकारांना काम देण्याचे एक तंत्र गेममध्ये दाखवले आहे. त्यात गरीबी आणि बेकारीवर शूट केले जाते आणि त्या तरुणाचे राहणीमान बदलते. त्याच वेळी विरोध करणारी शक्ती जागृत होते. नितेश राणे यांच्या दिशेने वार केले जातात तेव्हा केलेल्या विकासकामांच्या माध्यमातून मिळालेल्या शक्ती (शिल्ड)च्या आधारे तो वार परतवला जातो. दगड, गोटे, जेव्हा पायात येतात तेव्हा हिरो उडी घेऊन पुढे जातो. नवी आव्हाने स्वीकारून जिल्हय़ाच्या विकासात भर घालतो. हा विकास जेव्हा पायाभूत सुविधांसह उभा राहतो. तेव्हा राजकीय विरोधक थेटपणे विरोध करू लागतात. मात्र, त्या वेळी यापूर्वी केलेल्या कामांची ‘शिल्ड’ रूपाने शक्ती वापरून प्रतिकार होतो. त्यात विरोधकांची ताकद संपते आणि हिरो हा ‘सुपरहिरो’ बनतो असा हा गेम आहे.
या गेमच्या निर्मितीसाठी इंजिनिअरिंग कॉलेजचे प्रा. सागर सईकर, प्रा. दर्शन म्हापसेकर, प्रा. मनोज खाडिलकर यांच्या मार्गदर्शनाखाली नितीन पनवार, आकाश पाथरे, निनाद पारधीये, योगेश वावळीये, जॉस्टन फर्नाडीस, निनाद मेहर, अश्विन बटेकर, ऋतुजा नेवगी, अक्षता महाले, प्रतिज्ञा ला. कांबळे, शुभम निकम यांनी मेहनत घेऊन हा मोबाइल गेम तयार केला आहे.
https://play.google.com/store/apps/details?id=com.garyburnguitar.superheroofkankavli
या लिंकवर क्लिक करा.