पिंपरीतील प्रस्तावित कत्तलखान्याविरोधातील पिंपरी बाजारपेठेतील व्यापा-यांनी सोमवारी रेल रोको आंदोलन केले. त्यामुळे…
पुणे- पिंपरीतील प्रस्तावित कत्तलखान्याविरोधातील पिंपरी बाजारपेठेतील व्यापा-यांनी सोमवारी रेल रोको आंदोलन केले. त्यामुळे तणावाचे वातावरण निर्माण झाले असून परिसराला पोलिस छावणीचे स्वरूप आले आहे.
पिंपरी बाजारपेठेजवळ डाल्को कंपनीशेजारील जागेत महापालिकेच्या वतीने प्रस्तावित असलेल्या कत्तखान्याला येथील व्यापा-यांचा विरोध आहे. मात्र, बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर तात्पुरत्या स्वरूपात हा कत्तलखाना सुरू करण्यास महापालिकेने परवानगी दिली. त्यामुळे संतप्त झालेल्या व्यापा-यांनी रेल रोको केला. त्यामुळे व्यापारी व पोलिसांमध्ये जोरदार वादावादी झाली. पिंपरी रेल्वे स्थानकावर पुणे-लोणावळा लोकल रोखून धरण्यात आली. त्यामुळे पिंपरीत दंगलसदृश परिस्थिती निर्माण झाली होती. त्यामुळे परिसरात मोठया प्रमाणावर पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आला.
रेलरोको आंदोलनामुळे पुणे-लोणावळा रेल्वे वाहतूक तब्बल तीन तास खोळंबली होती. कत्तलखान्याला तात्पुरती स्थगिती दिली गेल्याने व्यापारी रेल्वे मार्गावरून बाजूला झाले. त्यानंतर तीन तास खोळंबलेली रेल्वे वाहतूक सुरू झाली.