एकेक युग मागे पडते, तसतसे बाजारपेठेत नवीन उत्पादनांचे संच प्रवेश करतात. पन्नास वर्षापूर्वी नॉनस्टिक कुकवेअरसोबत हे सुरू झाले आणि कुकवेअर बाजारपेठ विकसित होतच राहिली. रिअॅलिटी प्रोग्राम्स आणि टीव्हीवरील कुकिंग शोजमुळे ग्राहक आता कुकवेअरबद्दल अधिक जागरूक झाले आहेत आणि रिटेल दुकाने विविध दरसूचीतील वैविध्यपूर्ण उत्पादनांनी ओसंडून वाहत आहेत.
मागील तीन वर्षापर्यंत सार्वजनिक स्तरावर घेतल्या जाणा-या भारतीय रिटेल क्षेत्राच्या कोणत्याही विश्लेषणात कुकवेअर रिटेलचा स्वतंत्रपणे उल्लेखही केला जात नव्हता. मात्र, ही स्थिती हळूहळू सुधारत आहे. भारतीय ग्राहकांच्या केवळ कार्यात्मक गरजा पूर्ण करण्यापलीकडे हा आधुनिक रिटेल व्यवसाय ग्राहकांच्या अधिक वैविध्यपूर्ण गरजा – मग ती सोय असो, फॅशन असो की दर.. त्या पूर्ण करण्याचा प्रयत्न करत आहे. सध्या, भारतातील कुकवेअरची बाजारपेठ ३२० ते ३६० दशलक्ष डॉलर्सच्या दरम्यान असून यात किचन अॅक्सेसरीजच्या बाजारपेठेचा वाटा केवळ १८ टक्क्यांच्या आसपास आहे. एकेकाळी ही बाजारपेठ खूपच असंघटित स्वरूपात होती आणि बाजारपेठेचा केवळ ३५-४० टक्के वाटा संघटित स्वरूपाच्या कंपन्यांकडे होता. मात्र, ही परिस्थिती आता बदलली आहे. भारतातील कुकवेअर उद्योगाला मोठी चालना मिळाली आहे आणि तो वेगाने वाढत आहे. हा उद्योग २१ टक्के दराने वाढणार अशी अपेक्षा आहे आणि हे क्षेत्र उभे करणारे काही महत्त्वाचे घटक समजून घेणे आवश्यक आहे.
तंत्रज्ञानात्मक प्रगती कोणत्याही क्षेत्रात महत्त्वाची भूमिका पार पाडते आणि कुकवेअर उद्योगही याला अपवाद नाही. पारंपरिक सीमांच्या पलीकडे पोहोचण्यात आम्हाला तंत्रज्ञानाने खूप मोठी मदत केली आहे. पूर्वी पाककृती, भांडी आणि पद्धती याबाबत ग्राहकांचा दृष्टिकोन पारंपरिक होता. आता सगळे जगच अधिक स्मार्ट होऊ लागले असताना, लोकांनी नवीन पर्याय स्वीकारण्यास सुरुवात केली आहे आणि त्यांचा दृष्टिकोनही आधुनिक होत आहे.
एकेक युग मागे पडते, तसतसे बाजारपेठेत नवीन उत्पादनांचे संच प्रवेश करतात. पन्नास वर्षापूर्वी नॉनस्टिक कुकवेअरसोबत हे सुरू झाले आणि कुकवेअर बाजारपेठ विकसित होतच राहिली. रिअॅलिटी प्रोग्राम्स आणि टीव्हीवरील कुकिंग शोजमुळे ग्राहक आता कुकवेअरबद्दल अधिक जागरूक झाले आहेत आणि रिटेल दुकाने विविध दरसूचीतील वैविध्यपूर्ण उत्पादनांनी ओसंडून वाहत आहेत. मोठय़ा प्रमाणात उत्पादन झाल्यामुळे कुकवेअर कमी किमतीत देणे शक्य झाले आहे. परिणामी, ग्राहकांना निवडीसाठी खूप पर्याय उपलब्ध झाले आहेत.
प्रवाहांबद्दल बोलायचे तर, कुकवेअर बाजारपेठेवर वर्चस्व गाजवणारे अनेक महत्त्वाचे प्रवाह आहेत; यामध्ये एखादे उत्पादन केवळ स्वयंपाकघरातील कामाचे साधन न वाटता आकांक्षेवर आधारित जीवनशैलीचा भाग वाटले पाहिजे या हेतूने शैलीदार कुकवेअर उत्पादने निर्माण करणे हा एक महत्त्वाचा प्रवाह. यामध्ये पर्यावरणपूरकतेबाबत ग्राहकांच्या इच्छा तसेच उत्पादनातील आरोग्याची व सुरक्षितेतेची बाजूही आली. शिवाय, कुकवेअरमधील शैली आणि फॅशन हे घटक अधिकाधिक महत्त्वाचे होत चालले आहेत. सुरक्षिततेच्या कारणांमुळे, ग्राहकांनी प्लास्टिकचा वापरही टाळण्यास सुरुवात केली आहे. प्लास्टिकमध्ये आढळणारे काही विषारी घटक कर्करोगापासून वंध्यत्वापर्यंत अनेक समस्यांना कारणीभूत ठरत आहेत हे अभ्यासाअंती सिद्ध झाले आहे. याप्रकारच्या रसायनांशी संपर्क आल्यामुळे चयापचय क्रियेतही बदल घडून येतात आणि या क्रियेत कॅलरीज बाहेर पडण्याऐवजी शरीरात साठवून ठेवल्या जाऊन स्थूलत्व येते. याला परवडण्याजोगा, सोयीस्कर आणि सुरक्षित पर्याय म्हणजे काच, विशिष्ट प्रकारचे स्टेनलेस स्टील किंवा सिरॅमिक कुकवेअर. स्वयंपाकघरासाठी सर्वोत्तम पर्याय आहे तो स्टेनलेस स्टील कुकवेअरचा यात वादच नाही.
काळ बदलला, तशी छोटय़ा घरांसाठी, अपार्टमेंट्ससाठी आणि प्रवासात वापरता येतील अशी आटोपशीर भांडी कुकवेअरच्या अनेक ब्रॅण्ड्सनी बाजारात आणली. कमी जागा उपलब्ध असलेल्यांसाठी हा सर्वोत्तम पर्याय ठरला. बुद्धिमत्तेचा वापर करून स्वयंपाकाच्या दिशेने एक पाऊल आणखी टाकत अनेक ब्रॅण्ड्सनी काढण्या-घालण्याजोग्या (डिटॅचेबल) हॅण्डल्सची भांडी बाजारात आणली. या नवीन शोधांनंतर, आपण आजपर्यंत कुकवेअरच्या डिझाइन्स आणि दर्शनी रूपात अनेक बदल पाहिले. स्वयंपाकघरात चपखल बसेल अशा कुकवेअरच्या मागणीची पद्धतही बदलली. या बाजारपेठेत अनेक ब्रॅण्ड्स दाखल झाले आणि स्पर्धा वाढीस लागली. शैलीदार कुकवेअर आणल्यानंतर या ब्रॅण्ड्सनी बहुपयोगी साधनांचा नवीन ट्रेण्ड सुरू केला. हा कल्पक शोध लोकांना फारच आवडला, कारण यामुळे त्यांचे स्वयंपाकघरातील काहीसे गुंतागुंतीचे आयुष्य सुलभ झाले. कष्टाची जागा चातुर्याने घेतली आणि स्वयंपाक पूर्वी कधीही नव्हता एवढा सोपा झाला.
सध्याच्या तंत्रज्ञानात्मक जगात, लोक विविध प्रयोग करत आहेत आणि हे प्रयोग मीडियाच्या मदतीने सर्वत्र पोहोचवत आहेत. लोकांच्या विविध कल्पना, पाककृती, कल्पक शोध, पद्धती आणि स्वयंपाकाच्या शैली डिजिटल माध्यमातून जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्यात अलीकडेच विकसित झालेली अॅप्सही मदत करत आहेत. कुकवेअर उद्योग हा आता तंत्रज्ञानावर आधारित उद्योगांसारखा झाला आहे. सातत्याने नवीन शोध लागत आहेत, नवीन घडामोडी होत आहेत, एकंदर हा उद्योग आजपर्यंत कधीही विस्तारला नव्हता असा विस्तारत आहे.
– सुनील अगरवाल