कॅम्पाकोलामधील आपले निवासस्थान वाचविण्यासाठी सरकारकडून शेवटची आशा लागून राहिलेल्या रहिवाश्यांच्या पदरी निराशा आली आहे.
मुंबई – कॅम्पाकोलामधील आपले निवासस्थान वाचविण्यासाठी सरकारकडून शेवटची आशा लागून राहिलेल्या रहिवाश्यांच्या पदरी निराशा आली आहे. कॅम्पाकोलामधील अनधिकृत मजले अधिकृत करण्यासंबंधी अँर्टोनी जनरल दारियस खंबाटा यांनी नकारात्मक मत दिले आहे.
मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनीही कॅम्पाकोलासाठी कायद्याची चौकट मोडण्यास नकार दिला आहे. मुंब्र्यातील रहिवाशांच्या धर्तीवर आम्ही कॅम्पाकोलाच्या रहिवाशांचे पूर्नवसन करण्यास तयार आहोत असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. कॅम्पाकोलाचे अनधिकृत मजले वाचवण्यासाठी न्यायाधीश श्रीकृष्ण यांनी अध्यादेश काढण्याचा सल्ला दिला होता.
मात्र गुन्हेगारांना वाचवण्यासाठी केंद्राने काढलेल्या अध्यादेशासारखी त्याची स्थिती होण्याची भिती असल्याने राज्य सरकार असा कुठलाही अध्यादेश काढण्यास तयार नाही. कॅम्पाकोला कंपाउंडमधील इमारतीचे अनधिकृत मजले तोडण्याच्या कारवाईला मंगळवारपासून प्रारंभ होणार आहे. घरे रिकामी करण्याचा सोमवार शेवटचा दिवस आहे. दरम्यान, हे अनधिकृत मजले वाचवण्यासाठी रहिवाशांचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत.