केंद्रीय मंत्रिमंडळाच्या विस्तारात नव्याने समावेश करण्यात आलेले गोव्याचे मनोहर पर्रिकर यांना केंद्रीय संरक्षण तर माजी शिवसैनिक सुरेश प्रभू यांच्याकडे रेल्वेमंत्रायलायाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.
नवी दिल्ली – केंद्रीय मंत्रिमंडळाच्या विस्तारात नव्याने समावेश करण्यात आलेले गोव्याचे मनोहर पर्रिकर यांना केंद्रीय संरक्षण तर माजी शिवसैनिक सुरेश प्रभू यांच्याकडे रेल्वेमंत्रायलायाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. रविवारी रात्री उशिरा हे खातेवाटप जाहीर कऱण्यात आले. रविवारी झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या विस्तारात २१ नव्या चेह-यांचा समावेश करण्यात आला.
तर अर्थमंत्री अरुण जेटलींकडे माहिती आणि प्रसारण मंत्रिपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. नवे केंद्रीय मंत्री जे.पी.नड्डा आणि वीरेंद्र सिंग यांच्याकडे अनुक्रमे आरोग्य आणि ग्रामविकास ही खाती सोपवण्यात आली आहेत. तर हर्षवर्धन यांच्याकडे विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रिपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.
मोदी सरकार सत्तेत आल्यानंतर सहा महिन्यांनी मंत्रिमंडळाचा पहिला विस्तार करण्यात आला. यामध्ये चार कॅबिनेट, १४ राज्यमंत्री आणि तीन राज्यमंत्री(स्वतंत्र प्रभार) यांचा समावेश आहे. या विस्तारामुळे मंत्रिमंडळातील मंत्र्यांची संख्या ४५ वरुन ६६ वर पोहोचली आहे. यामध्ये २७ कॅबिनेट मंत्री, १३ राज्यमंत्री(स्वतंत्र प्रभार)आणि २६ राज्यमंत्रीपदे आहेत.
वाजपेयी सरकारच्या मंत्रिमंडळातील माजी मंत्री बंडारु दत्तात्रय यांच्याकडे श्रम आणि रोजगार आणि राजीव प्रताप रुडी यांच्याकडे कौशल्य विकास आणि उद्योजकता तसेच संसदीय कामकाज मंत्रिपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.
कॅबिनेट मंत्री
»मनोहर पर्रिकर – संरक्षण
»जे.पी नड्डा – आरोग्य व कुटंब कल्याण
»सुरेश प्रभू – रेल्वे
»वीरेंद्र सिंह चौधरी – ग्रामविकास, पंचायत राज, पाणीपुरवठा आणि स्वच्छता
राज्यमंत्री
»गिरीराज सिंग – सूक्ष्म, लघु, मध्यम उद्योग
»मोहन कुंदारिया – कृषी
»सनवर लाल जट – जलसंसाधन, नदी विकास आणि गंगा जोड
»हरिभाई पार्थीभाई चौधरी – गृह
»राम कृपाल यादव – पाणीपुरवठा व स्वच्छता
»मुख्तार अब्बास नक्वी – अल्पसंख्यांक आणि संसदीय कामकाज
»हंसराज आहिर – रसायन आणि खते
»डॉ. रामशंकर कटेरिया – मानव संसाधन विकास
»वाय.एस.चौधरी – विज्ञान आणि तंत्रज्ञान, भूविज्ञान
»जयंत सिन्हा – अर्थ राज्यमंत्री
»राज्यवर्धन सिंग राठोड – माहिती व प्रसारण
»बाबूल सुप्रियो – नगरविकास, गृहनिर्माण आणि दारिद्रय निर्मूलन
»साध्वी निरंजन ज्योती – अन्न प्रक्रिया उद्योग
»विजय सम्पला – सामाजिक न्याय व सबलीकरण
राज्यमंत्री(स्वतंत्र प्रभार)
»बंडारु दत्तात्रय – श्रम आणि रोजगार
»राजीव प्रताप रुडी – कौशल्य विकास आणि उद्योजकता तसेच संसदीय कामकाज
»डॉ. महेश शर्मा – सांस्कृतिक, पर्यावरण आणि हवाई वाहतूक