केनियाच्या मंडेरा भागातील एका खाणीवर अल-शबाब या दहशतवादी संघटनेच्या अतिरेक्यांनी हल्ला केला.
नैरोबी – केनियाच्या मंडेरा भागातील एका खाणीवर अल-शबाब या दहशतवादी संघटनेच्या अतिरेक्यांनी हल्ला केला. अतिरेक्यांनी खाणीमध्ये केलेल्या अंदाधुंद गोळीबारात ३६ मजूर ठार झाले.
मंडेरा हा भागा सोमालियाच्या सीमेजवळ आहे. सोमालियाच्या अल-शबाब या दहशतवादी संघटनेचे हे अतिरेकी आहेत. मंडेरा शहरापासून ही खाण १५ कि.मी अंतरावर होती.
मागच्या महिन्यात या भागातून अल-शबाबच्या दहशतवाद्यांनी नैरोबीला जाणा-या बसचे अपहरण केले होते. यावेळी प्रवाशांवर केलेल्या गोळीबारात २८ जण ठार झाले होते.