कोळसा खाण वाटप घोटाळ्याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाकडून माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना दिलासा मिळाला आहे.
नवी दिल्ली – कोळसा खाण वाटप घोटाळ्याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाकडून माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना दिलासा मिळाला आहे.
मनमोहन सिंग यांच्यासह उद्योगपती कुमार मंगलम बिर्ला, माजी कोळसा सचिव पी.सी.पारेख आणि इतर तिघांना सीबीआयच्या विशेष न्यायालयाने बजावलेल्या समन्सला सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी स्थगिती दिली.
न्यायमूर्ती व्ही.गोपाल गौडा आणि न्यायमूर्ती सी. नागप्पन यांच्या खंडपीठाने या प्रकरणी सीबीआयला नोटीस पाठवत येत्या चार आठवड्यात उत्तर देण्याचे आदेश दिले आहेत.
तालिबारा २ कोळसा खाणवाटपप्रकरणी सीबीआय न्यायालयाने माजी पंतप्रधान सिंग यांच्यासह सहा जणांना समन्स बजावले होते. आठ एप्रिलला त्यांना न्यायालयात सादर राहण्याचे आदेश देण्यात आले होते.
या समन्सविरोधात सिंग यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. या याचिकेवर आज सुनावणी झाली. या सुनावणीदरम्यान न्यायालयाने समन्सला स्थगिती दिली.