ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाचे नवे प्रशिक्षक म्हणून माजी कसोटीपटू डॅरिल लीमन यांनी पदभार स्वीकारला. आघाडीच्या फळीतील एक खमका आणि आक्रमक फलंदाज म्हणून लीमन यांची ओळख होती. सूर हरवलेल्या ऑस्ट्रेलिया क्रिकेटला पुन्हा संजीवनी मिळवून देण्यासाठी लीमन यांचा कस लागेल. वनडे वर्ल्डकपच्या हॅटट्रिकसह विक्रमी चार जेतेपदे, कसोटी क्रमवारीत अव्वल स्थान आणि आयसीसी चँपियन्स ट्रॉफी दोनदा पटकावण्याचा पराक्रम ऑस्ट्रेलियाने केला आहे. १९८७ ते २००७ अशी दोन दशके ऑस्ट्रेलियाने टी-२० वर्ल्डकपवगळता सर्वच प्रकारांत अधिराज्य गाजवले. मात्र गेल्या दोन वर्षात कांगारूंची कामगिरी खालावत चालली आहे. टिम नील्सन यांच्यानंतर दक्षिण आफ्रिकेचे मिकी आर्थर यांच्याकडे ऑस्ट्रेलियाच्या प्रशिक्षकपदाची जबाबदारी आली. मात्र परदेशी प्रशिक्षक आर्थर यांना कांगारूंचे ‘कल्चर’ समजून घेता आले नाही. त्यामुळे ऑस्ट्रेलियाची मैदानावरील कामगिरी ढेपाळली. ‘ड्रेसिंगरूम’मध्येही एकवाक्यता समन्वय राखण्यात ४५ वर्षीय प्रशिक्षक आर्थर यांना अपयश आले. २०११ नंतर त्यांच्या प्रशिक्षकपदाखाली ऑस्ट्रेलियाने १९ कसोटी सामने खेळले. त्यात १० सामन्यांत विजय मिळाला तर सहा सामन्यांत पराभव पाहावा लागला. जवळपास दीड दशक आंतरराष्ट्रीय कसोटी क्रिकेटमध्ये दबदबा राखणारा ऑस्ट्रेलिया कसोटी क्रमवारीत चौथ्या स्थानी घसरला आहे. वनडेतही तीच अवस्था आहे. जागतिक स्पर्धात ऑस्ट्रेलियाने निराशा केली आहे. इंग्लंडमध्ये नुकत्याच झालेल्या आयसीसी चँपियन्स ट्रॉफीत गतविजेत्यांना एकही विजय मिळवता आलेला नाही. वनडे क्रमवारीत सध्या ऑस्ट्रेलिया तिस-या स्थानी आहेत. ढेपाळलेल्या माजी जगज्जेत्यांना पुन्हा लौकिक मिळवून देण्याचे मोठे आव्हान नवे प्रशिक्षक लीमन यांच्यासमोर आहेच. त्यांची पहिली परीक्षा अॅशेसमध्ये असेल. दोन आठवडयांवर येऊन ठेपलेली अॅशेस मालिका म्हणजे ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडमधील ‘कसोटीयुद्ध’च असते. या मालिकेकडे या दोन देशांतील नव्हे तर जगभरातील क्रिकेट चाहत्यांचे लक्ष लागून राहिलेले असते. ऑस्ट्रेलियाला भारतात कसोटी मालिकेत सपाटून मार खावा लागला. अॅशेस मालिका या वेळी इंग्लंडमध्ये होणार असल्याने वातावरण आणि खेळपट्टय़ांशी जुळवून घेण्याचे आव्हान ऑस्ट्रेलियासमोर आहे. चँपियन्स ट्रॉफीत निराशा केल्याने क्रिकेटपटूंचा आत्मविश्वास उंचावण्यासाठी लीमन यांना अनेक नवे ‘फंडे’ वापरावे लागतील. क्रिकेटपटूंमध्ये एकवाक्यता आणण्यादृष्टीने ड्रेसिंगरूममध्ये सौहार्दपूर्ण आणि खेळीमेळीचे वातावरण ठेवण्याला प्राधान्य देण्याचे लीमन यांनी ठरवले आहे. त्यांचे हे पाऊल योग्यच वाटते. मानसिक आणि शारीरिकदृष्टया सक्षम असल्यास मैदानावरील कामगिरी उंचावेल, असे लीमन यांचे म्हणणे आहे. लीमन यांना डोमेस्टिक आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा खूप अनुभव आहे. त्याशिवाय ‘अ’ संघाचे प्रशिक्षक म्हणून सध्या ते कार्यरत होते. त्यांचा खमक्या स्वभाव आणि क्रिकेटमधील अनुभव ऑस्ट्रेलियाच्या विद्यमान क्रिकेटपटूंसाठी खूप उपयोगी पडू शकतो. मात्र त्यांनी त्याचा पुरेपूर फायदा घ्यायला हवा. स्वत: ऑस्ट्रेलियन असल्याने तसेच ऑस्ट्रेलियाच्या सुवर्णकाळाचे साक्षीदार असल्याने प्रशिक्षकपदाला न्याय देण्यासाठी लीमन उत्सुक आहेत. मात्र हा ‘लीमन स्पर्श’ ऑस्ट्रेलिया क्रिकेटसाठी कितपत उपयोगी पडतो, हे येणारा काळच सांगेल.
खमक्या फलंदाजाची ‘कसोटी’
RELATED ARTICLES
Recent Comments
किल्ले जीवधन
on
संपर्क
on
संपर्क
on
संपर्क
on
आमच्या बद्दल
on
आमच्या बद्दल
on
संपर्क
on
अभिजात भाषा
on
आळशी मांजर
on
आमचा टॉम
on
छोटीशी सोनू
on
संपर्क
on
संपर्क
on
संपर्क
on
संपर्क
on
संपर्क
on
मनातली कविता
on
संपर्क
on
हेल्पलाइन
on
दगडफूल
on
हेल्पलाइन
on
संपर्क
on
संपर्क
on
भयाचे भूत..
on
मोदी करिष्मा
on
E-Book
on
गुणकारी शेपू
on
निष्ठावंत
on
संपर्क
on
संपर्क
on
५१ मध्ये ७
on
गर्दीच गर्दी
on
मूक मोर्चा
on
RSS NEWS
on
आमच्या बद्दल
on
आमच्या बद्दल
on
महात्मा…
on
संपर्क
on
आमच्या बद्दल
on
संपर्क
on
रामघळ
on
आमच्या बद्दल
on
आमच्या बद्दल
on
आमच्या बद्दल
on
वाढदिवस
on
वृक्षारोपण
on
रमाचा दुखणा
on
तगडे उमेदवार
on
आमची दिवाळी…
on
आमच्या बद्दल
on
आमच्या बद्दल
on
अनुभव
on
गीर गाय
on
सगुणेचा संप
on
तपास पथक
on
संपर्क
on
भुजंगासन
on
एकटेपणाची सल
on
संपर्क
on
ईश्वर
on
आयपीएल
on
“न्याय द्या”
on
“अभिवादन”
on
आमच्या बद्दल
on
संपर्क
on
संपर्क
on
E-Book
on
हॉटेलचं हृदय
on
फसवणूक
on
भीषण आग..
on
आज टिप ऽऽर!
on
संपर्क
on
संपर्क
on
अमिषा पटेल..
on
संपर्क
on
माझी आई
on
मनातलं
on
वेलकम बॅक
on
संपर्क
on
शटर लाईफ
on
“कुराण वाचन”
on
चढणीचे मासे
on
संपर्क
on
वैशाख वणवा
on
आजोळचे दिवस
on
संपर्क
on
संपर्क
on
कचरा नकोच!
on
मनातलं
on
मनातलं
on
संपर्क
on
संपर्क
on
जैतापूरच..!
on
मनातलं
on
मनातलं
on
मनातलं
on
तो अन् मी
on
मनातलं
on
मनातलं
on
मनातलं
on
मनातलं
on
मनातलं
on
संपर्क
on
संपर्क
on
नूरा कुस्ती
on
“सन्नाटा”
on
खाकीला डाग!
on
सजीव गाथा
on
संपर्क
on
संपर्क
on
आमच्या बद्दल
on
सिगारेट
on
संपर्क
on
सोशल पोलिस
on
गु-हाळ
on
जिंकणारच!
on
आम आदमी सेना
on
ग्रँड चव
on
पाणी
on
पाणी
on
जिंकणारच!
on
जिंकणारच!
on
चमकेशगिरी
on
म्हाळवस
on
सुमंगल यश
on
अर्नोल्ड
on
दहीहंडी
on
भूकंपानंतर…
on
वाघ तो वाघच
on
आदिती राव
on
मुंबई चिंब!
on
वाहतूकवेडा
on
स‘माज’
on
मैं हूँ ना!
on
मेट्रो आली
on
“हीच ती कार”
on
सत्तातूर !
on
विजय सलामी
on
मतदान करा..
on
नाजूक त्वचा
on
जागे व्हा
on
नाच रे मोरा…
on
काठयांचा खेळ
on
“विसर्जन”
on
रेल्वे ठप्प
on
रेल्वे ठप्प
on
भन्नाट
on
“सिंग साहब
on
ऊस पेटला
on
चतुरस्र श्री
on
पेन स्टॅण्ड
on
आनंदाची चाळ
on
चंड‘प्रतापी’
on
महाकुंभ
on
सैतानाचा बाप
on
सुखोई सफर
on
कसाब फासावर
on
कसाब फासावर
on
कसाब फासावर
on
कसाब फासावर
on
बलिष्ठ गवा
on
मराठी बिराठी
on