कुठल्याही अटीविना इस्त्रायल आणि पॅलेस्टाईनने ७२ तासांचा शस्त्रसंधीचा प्रस्ताव स्वीकारल्याचे इजिप्तने जाहीर केले आहे. संयुक्त राष्ट्रासंघाचे सरचिटणीस बान की मून यांनी या निर्णयाचे स्वागत केले आहे.
संयुक्त राष्ट्र – कुठल्याही अटीविना इस्त्रायल आणि पॅलेस्टाईनने ७२ तासांचा शस्त्रसंधीचा प्रस्ताव स्वीकारल्याचे इजिप्तने जाहीर केले आहे. संयुक्त राष्ट्रासंघाचे सरचिटणीस बान की मून यांनी या निर्णयाचे स्वागत केले आहे.
मून यांनी दोन्ही बाजूंना पुन्हा हिंसाचाराला सुरुवात होईल अशी पावले न उचलण्याची विनंती केली आहे. इजिप्तच्या मध्यस्थीने इस्त्रायल आणि हमास दोघांना युध्दविरामाची संधी मिळाली आहे. सर्व नागरीकांचे हित डोळयासमोर ठेवून दोन्ही बाजू शस्त्रसंधी कायम ठेवतील अशी अपेक्षा मून यांनी व्यक्त केली.
पुन्हा युध्दाला सुरुवात होईल अशी पावले उचलू नका. मतभेदांवर ठोस, रचनात्मक तोडगा काढण्याचा प्रयत्न करा असे आवाहन मून यांनी केले. संयुक्त राष्ट्र यासाठी आवश्यक ते सहकार्य करण्यास तयार असल्याचे मून यांनी सांगितले. उद्धवस्त झालेल्या गाझाची पूर्नउभारणी आणि विकास व्हावा अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे