गुहागर नगरपंचायत निवडणुकीत एकूण १७ जागांपैकी ११ जागांवरती राष्ट्रवादीने यश संपादित केले.
गुहागर- गुहागर नगरपंचायत निवडणुकीत एकूण १७ जागांपैकी ११ जागांवरती राष्ट्रवादीने यश संपादित केले. तर भाजपला सहा जागांवरती समाधान मानावे लागले. त्यामुळे विधानसभा जि. प. व पं. स. पाठोपाठ भाजपची मक्तेदारी नगरपंचायत निवडणुकीतदेखील राष्ट्रवादीने चांगले यश संपादित करीत विजयाची हॅटट्रिक साधली आहे.
गेले अनेक दिवस असगोलीवासीयांच्या विरोधामुळे गुहागर नगरपंचायत निवडणूक चांगलीच गाजत होती. पालकमंत्री भास्कर जाधव यांच्यासाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची मानली जात होती. या निवडणुकीत अपेक्षेप्रमाणे धवल यश मिळवण्यात राष्ट्रवादीला यश आले नसले तरीदेखील भाजप-शिवसेनेच्या युतीमुळे पराभवाची असलेली जाणकारांची मते फोल ठरवत अखेर राष्ट्रवादीने पुन्हा एकदा गुहागरवर राष्ट्रवादीचा झेंडा फडकवला आहे. त्यामुळे आगामी २०१४ च्या विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादीने आपली दावेदारी मजबूत केली आहे.
असगोली वगळता गुहागरमध्ये राष्ट्रवादीला चांगले यश मिळाले आहे. असगोलीमधून आयत्या वेळी बहिष्कार मागे घेत तेथील ग्रामस्थांनी विरोधाला – विरोध कायम ठेवत राष्ट्रवादीला खाली खेचले आहे. एकूणच या निवडणुकीत भाजप व राष्ट्रवादी या दोन पक्षांमध्ये लढत झाली असून, इतर पक्षांचे म्हणावे तसे वर्चस्व दिसून आले नाही.
विजयी उमेदवारांची नावे
गीता खरे – राष्ट्रवादी, सुजाता बागकर – राष्ट्रवादी, दीपक कनगुटकर – राष्ट्रवादी, सुधाकर सांगळे – राष्ट्रवादी, स्नेहा भागडे – राष्ट्रवादी, प्रवीण रहाटे – राष्ट्रवादी, अनुराधा कदम – राष्ट्रवादी, नरेश पवार – राष्ट्रवादी, निधी सुर्वे – राष्ट्रवादी, स्नेहा वरंडे – राष्ट्रवादी, जयदेव मोरे – राष्ट्रवादी, शुभांगी मालप – भाजप, मंगेश जोशी – भाजप, ज्योती परचुरे – भाजप, श्रद्धा वराडकर – भाजप, गजानन वेल्हाळ – भाजप, संदीप चव्हाण – भाजप