तुमसर तालुक्यातील गरजूंना घरकुलाचा लाभ देण्यात यावा, पिपरी / चुन्नीवासीयांचे पुनर्वसन करावे, या मागण्यांच्या समर्थनार्थ भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वात अन्यायग्रस्तांनी केंद्रीय अवजड उद्योगमंत्री प्रफुल्ल पटेल यांना घेराव घातला.
भंडारा- तुमसर तालुक्यातील गरजूंना घरकुलाचा लाभ देण्यात यावा, पिपरी / चुन्नीवासीयांचे पुनर्वसन करावे, या मागण्यांच्या समर्थनार्थ भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वात अन्यायग्रस्तांनी केंद्रीय अवजड उद्योगमंत्री प्रफुल्ल पटेल यांना घेराव घातला.
तुमसर तालुक्याला पूर्वी इंदिरा आवास योजनेचे देण्यात आलेले लक्ष्यांक कमी करून, अनेकांना घरकुल नाकारण्यात आले. या विरोधात तालुक्यातील ३५७ घरकुल लाभार्थी आणि त्यांचे कुटुंब तसेच पिपरी / चुन्नी येथील नागरिक सिहोराच्या ग्रामीण सचिवालयातून गोबरवाही जोडमार्गावर एकत्र आले.
पं. स. सभापती कलाम शेख व जि. प. उपाध्यक्ष रमेश पारधी यांच्या नेतृत्वात आंदोलकांनी नारेबाजी करीत रस्ता रोखून धरला. याच वेळी केंद्रीयमंत्री पटेल चुल्हाड येथे जात असताना आंदोलकांनी त्यांचा ताफा अडवत घेराव घातला.
सरकारने इंदिरा आवास योजनेअंतर्गत घरकुलाचे उद्दिष्ट कमी केल्याने तालुक्यातील अनेक पात्र लाभार्थ्यांवर बेघर होण्याची वेळ आली. काहींनी सरकारचा पैसा आज नाही तर उद्या मिळेल, अशी आशा बाळगून आपली जुनी आणि पडकी घरे पाडून नवीन बांधकाम केले, त्यांच्यावरही आता संकट कोसळले आह़े धापेवाडा टप्पा क्ऱ २ चे बांधकाम पूर्ण होऊन पाणी अडवण्यास सुरुवात झाली असतानाही पिपरी / चुन्नीवासीयांचे पुनर्वसन करण्यात आले नाही़ पटेल यांनी या भागाचे खासदार या नात्याने समस्या मार्गी लावण्याचे आश्वासन आंदोलनकर्त्यांना दिले.