घरात मोकळा, स्वच्छ प्रकाश येत असेल आणि त्यात खेळती हवा असेल तर आणखी काय हवं? घरात कोणत्या सुखसोयी करायच्या आहेत हे एक वेळ नंतर ठरवता येईल, पण प्रकाश आणि मोकळ्या हवेचं गणित आधी सोडवावं लागतं. त्यासाठी घराची रचना विशिष्ट पद्धतीने करावी लागते. घराला मोठय़ा खिडक्या ठेवणं किंवा जाळीची दारं बसवणं हे त्यातले काही पर्याय असू शकतात. यासाठी घराची दिशा त्यासाठी कोणती हवी? प्रकाशासाठी घरात आणखी काय सुधारणा करता येतील याबद्दल थोडंसं महत्त्वाचं..
घराची स्वप्नं बघताना नेहमी एखाद्या मोकळ्या जागी, भरपूर हिरवळ असलेल्या परिसरात आणि निसर्गाची सगळी रूपं पाहायला मिळावीत, असं आपल्याला नेहमी वाटत असतं. आता शहरी जीवनात त्यातल्या सगळ्याच गोष्टी मिळणार नाहीत, हेदेखील तितकंच खरंय, पण घरात येणारी मोकळी हवा आणि स्वच्छ सूर्यप्रकाश या गोष्टींचा नक्कीच विचार करायला हवा. खरं तर आपला देश या दोन नसíगक देणग्यांनी समृद्ध आहे. भारतात वर्षभर आणि स्वच्छ सूर्यप्रकाश मिळणं ही जगाच्या काही भागांत चैन समजली जाते. त्यामुळे आपल्याला जे मिळालंय त्याची किंमत ओळखून त्याचा उपयोग करायला हवा. खेळत्या हवेचं म्हणाल, तर आपल्याकडे हवा खूप आहे, पण त्यात प्रदूषणाचं प्रमाण मात्र वाढतंय. त्यामुळे त्याची काळजी घेतली तर मोकळ्या हवेचा प्रश्नही सोडवता येईल. आता घर घेताना त्यात भरपूर सूर्यप्रकाश येईल आणि चांगली खेळती हवा राहिल असं पाहायला हवं. घराची रचना करतानाच आता या गोष्टी पाहाव्या लागतात. अनेकदा ब्लॉक सिस्टिममध्ये राहताना त्याला काही मर्यादा येतात. पण तिथे फ्लॅट पसंत करताना आपण यातल्या काही गोष्टी पाहून घेऊ शकतो किंवा जास्तीच्या सुविधांमध्ये यातल्या काही गोष्टींची मागणी करू शकतो.
घरात चांगला प्रकाश आणि हवा घरात हवी असेल तर घर आधी तीन बाजूंनी मोकळं आहे, याची खात्री करून घ्यायला हवी. आजकाल अनेक अपार्टमेंटमध्येही ही सोय केलेली असते. तीन बाजू मोकळ्या मिळाल्या की, घराला प्रकाश मिळायला अडचण येत नाही. प्रत्येक खोलीतील खिडक्यांची साईज मोठी हवी. शिवाय त्याला ओव्हर हेड वेंटिलेटर बसवून घ्यायला हवेत. त्याच्यावर काच लावून घ्यावी. यामुळे नसíगक प्रकाश घरात यायला मदत होते. डायिनग एरिया, लिव्हिंग रूम किंवा लॉबी यांच्या मागच्या बाजूला स्लायिडग ग्लेज दरवाजे लावून घ्यावेत. त्यामुळे दार लावलेलं असेल तरी घरात प्रकाश यायला मदत होते. किचनमध्ये रचना करताना त्यात एक मोठी खिडकी आणि त्याला जाळीचा दरवाचा अवश्य बसवून घ्यावा. बेडरूमच्या खिडक्या बसवताना अशी रचना असावी की, त्या बाहेरच्या बाजूला उघडाव्यात. त्याच्यावर पेव्हमेंट असावे. यामुळे पावसाळ्यात पाणी घरात येत नाही. हवा आणि प्रकाश आत यायला मदत होते.
बाथरूमच्या खिडक्यांचीही विशेष काळजी घ्यायला हवी. इथे हवा खेळती राहणं जास्त गरजेचं आहे. बाथरूममध्ये दोन सव्वा दोन फुटाची टिंटेड ग्लास असलेली खिडकी एक्झॉस्ट फॅनच्या जवळ बसवावी. बाथरूममध्ये साचलेलं पाणी लवकर वाळण्यासाठी तिथे हवा खेळती राहणं गरजेचं होतं. तसंच आजकाल तिथे हिटर लावला जात असल्यानेही तिथलं तापमान वाढण्याची शक्यता जास्त असते. म्हणून इथे हवा खेळती राहणं ही गरज बनली आहे.
काही ठिकाणी बेसमेंटही असतात. खासकरून स्वतंत्र बंगला असेल तर खालची जागा स्टोरेज किंवा अन्य कारणांसाठी वापरली जाते. अशा वेळी तिथेही नसíगक प्रकाश येणं गरजेचं असतं. त्यासाठी जमिनीपासून चार फुटावर वेंटिलेटरची व्यवस्था करायला हवी. त्यामुळे बेसमेंटमध्ये हवा तर येईलच पण प्रकाश यायलाही मदत होईल.
अनेक बिल्डिंगच्या तळमजल्यावर काही हॉल तयार केलेले असतात. तिथे एकाच वेळी जास्त माणसं वावरू लागली की, श्वास घ्यायलाही अडचण येऊ लागते. तिथे व्हेंटिलेटरची व्यवस्था असायलाच हवी. अशा ठिकाणी नसíगक प्रकाश येण्याचीही व्यवस्था केली जाऊ शकते. त्यासाठी सन पाइप वापरतात. त्यात रिफ्लेक्टिव्ह पाइप घालून छतातून नसíगक प्रकाश आत घेतला जातो. ही पद्धती जरा महाग असल्याने त्याचा उपयोग फार कमी ठिकाणी केला जातो.
घराला मागच्या किंवा पुढच्या बाजूला एखादा पॅसेज असेल आणि ती जागा तुम्हाला हवा आणि प्रकाश येण्यासाठी वापरून घ्यायची असेल तर हा पॅसेज ट्रान्सफरंट अॅस्बेस्टस शीट लावून बंद करून घ्यावा. त्यामुळे घरात प्रकाश यायला मदत होईल आणि ती जागाही वापरता येईल.
काही ठिकाणी घरातल्या प्रत्येक िभतीला खिडकी करून घेणं शक्य नसतं. अशा वेळी या भिंतीत मधला भाग काढून तिथे वुडन फ्रेम असलेला ब्लॉक ग्लास पार्टिशन वॉल बसवून घ्यायला हरकत नाही. त्यामुळे खिडकीतला प्रकाश घरात यायला मदत होईल.
प्रकाश घरात येणं ही गरज असली तरी ऐन उन्हाळ्यात मात्र उन्हाच्या झळाही आत येतात आणि डोळ्यांनाही उन्हाचा त्रास होतो. अशा वेळी याच खिडक्यांच्या काचेवर काळी फिल्म लावून घेता येईल. किंवा ब्लाइंड्सची व्यवस्था करता येईल. याशिवाय लायिनग असलेले पडदे लावूनही उन्हाचा चटका कमी करता येईल. हे पर्याय उन्हाळ्यापुरते वापरल्यानंतर काढून ठेवता येतात.
घराला क्रॉस व्हेंटिलेशन असणं हेही फार महत्त्वाचं आहे. त्यासाठी घराची रचना पूर्व-पश्चिम असेल तर अधिक उत्तम. तसं नसेल तर घराचे दार आणि खिडक्या उघडय़ा राहून त्यातून हवा खेळती राहील याची खात्री करायला हवी. या गोष्टींची काळजी घेतली तर घराचं आणि घरात राहणा-या माणसांचं आरोग्य नक्कीच चांगलं राहील.