मिनी स्कर्टपासून ते फूल लेंथ स्कर्टपर्यंत या सा-यांचीच बाजारात चलती दिसून येत आहे. पण सर्वात जास्त खरेदी फूल लेंथ स्कर्टची केली जाते. पण आपल्याला कोणता स्कर्ट सूट होतोय किंवा कोणता स्कर्ट कसा निवडावा याविषयी मनात भ्रम निर्माण होतो. म्हणूनच बाजारात आलेल्या या स्कर्ट्स आणि ते निवडण्याच्या काही कल्पना खास तुमच्यासाठी.
साधारण कोणत्याही बाजारात एक फेरफटका मारला की लक्षात येईल की, आता गाजत असलेल्या फॅशनमध्ये स्कर्ट आणि लेंग्याचा बोलबाला जास्त आहे. मिनी स्कर्टपासून ते फूल लेंथ स्कर्टपर्यंत या सा-यांचीच बाजारात चलती दिसून येत आहे. पण सर्वात जास्त खरेदी फूल लेंथ स्कर्टची केली जाते, यालाच आपण लेहेंगाही म्हणू शकतो. फॉर्मल्स लूकपासून ते फॅन्सी लूकसाठीही सध्या निवड केली जाते ती स्कर्ट्सची. लग्नकार्यातही लेहंेगा वापरला जातो. आजकाल या भरीव लेहेंग्याला प्रचंड मागणी तरुणींमध्ये दिसते. त्यामुळे कोणत्या टॉपवर, कोणत्या रंगात कोणता लेहेंगा किंवा स्कर्ट खुलून दिसेल याविषयी थोडीशी माहिती.
ए-लाईन स्कर्ट
साधारण प्रोफेशनल लूक असणा-या या ए लाईन स्कर्टला ऑफिसला जाणा-या तरुणींची जास्त मागणी आहे. आपल्या कमरेभोवती परफेक्ट बसणारा आणि काहीसा ‘ए’ आकारात असणारा हा स्कर्ट फॉर्मल्स लूकवर साजेसा वाटतो.
भरीव गोलाकार स्कर्ट
फूल लेंथ स्कर्ट प्रकारात मोडणारा हा भरीव गोलाकार स्कर्ट. या स्कर्टचा आकर्षकपणा म्हणजे या स्कर्टला घेर फार असतात. त्यामुळे घरगुती कार्यक्रमातही झक्कास लूक येण्याकरता हा स्कर्ट घातला जातो.
स्कर्टचा एसेंट रंग
स्कर्ट निवडताना सर्वात मोठा अडथळा म्हणजे रंगाचा. कोणत्या रंगाचा स्कर्ट जास्त आकर्षक वाटेल या विचारात सा-याच तरुणी असतात. पण जर फूल लेंथचा स्कर्ट किंवा लेहेंगा घ्यायचा असेल तर एसेंट रंग म्हणजेच जरा फिकट पिंक, फिकट नारिंगी अशा रेंजमध्ये घेतल्यास छान वाटतो. त्यामुळे कोणत्याही टॉपवर हा अगदी आकर्षित वाटतो. जर हाल्फ किंवा शॉर्ट स्कर्ट घ्यायचा असेल तर राखाडीसारख्या किंवा त्या रेंजमधील रंगाचा विचार केल्यास उत्तम.
क्रॉपटॉपवर प्लीटेड स्कर्ट
सध्या टॉप्समध्ये सर्वात जास्त चलती आहे ती क्रॉपटॉपची. त्यामुळे या क्रॉपटॉपवरही स्कर्ट घालण्याची एक नवी फॅशन तयार होत आहे. त्यासाठी प्लीटेड म्हणजेच घेर असलेल्या लाँग स्कर्टला जास्त मागणी आली आहे. क्रॉपटॉपवर या प्रकारचे स्कर्ट अगदी खुलून दिसतात.
एम्ब्रॉयडरी स्कर्ट
प्लेन स्कर्टवर फक्त खालच्या बाजूस कडेने एम्ब्रॉयडरी असलेले स्कर्ट आता बाजारात येत आहेत. त्यामुळे या स्कर्टला काही वेगळाच लूक आहे. एखादा भडक रंग पण एकदम प्लेन कपडय़ावर फक्त कडेच्या बाजूने एम्ब्रॉयडरी वर्क केलेलं असतं. हा प्रकार आपण लग्न कार्यात तर वापरू शकतोच, त्याचप्रमाणे एखाद्या फॉर्मल पार्टीलाही घातल्यास योग्य वाटेल.
रॅप अराऊंड स्कर्ट
हा प्रकार आजकाल जास्त प्रमाणात पाहिला जातो. एक सलग कापड ज्यावर राजस्थानी प्रिंट, वारली पेंटिंग, आदिवासी पेंटिंग अशा विविध आकाराने हा तयार केलेला असतो.